भारतीय क्रिकेट टीम (Indian Team) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर (Australia Tour) जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात टी-20 मालिकेपासून दौरा सुरु होणार असून वर्षअखेरीस दोन्ही टीममध्ये टेस्ट आणि नंतर वनडे मालिकाही खेळली जाईल. बॉल टेंपरिंग प्रकरणामुळे टीम इंडियाचा 2018-19 मधील दौऱ्याला मुकणार ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) आता पुनरागमन करण्यास सज्ज आहे. वॉर्नर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये आगामी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळण्यास उत्सुक आहे. तथापि, या मालिकेदरम्यान तो विराट कोहलीविरूद्ध स्लेडिंगचा अवलंब करणार नाही. याआधी ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडने तो भारतीय संघाच्या दौर्या दरम्यान कर्णधार कोहली आणि टीम इंडियाला स्लेज करणार नसल्याचे कबूल केले होते. त्याला वाटते की विराट कोहली आणि संघ त्याचा फायदा म्हणून वापर करू शकतात. (राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाला दिली चेतावणी; विराट कोहलीविरोधात चुकूनही करू नका अशा प्रकारचे काम, वाचा सविस्तर)
या हाय प्रोफाइल मालिकेत वॉर्नरला कोहलीला डिचवायचे नाही आहे. तो म्हणाला, "विराट कोहली हा डिचवणारा माणूस नाही आणि अस्वलाला छेडण्यात काही अर्थ नाही." इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना वॉर्नर म्हणाला की विराटला आणि अस्वलाला डिचवणे एकसारखेच आहे. तो बॅटिंगने पलटवार करतो. आगामी मालिकेबद्दल वॉर्नर म्हणाला, "रिकाम्या स्टेडियममध्ये भारताचा सामना करणे अवास्तव ठरेल. मला संघात स्थान मिळवायचे आहे आणि त्या मालिकेचा एक भाग व्हायचे आहे. मागील वेळी आमची कामगिरी खराब नव्हती, परंतु चांगल्या संघाने आम्हाला पराभूत केले आणि त्यांची गोलंदाजी आश्चर्यकारक आहे." गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा कोहली हा पहिला भारतीय कर्णधार आहे आणि तो पुन्हा या पराक्रमाची पुनरावृत्ती करू इच्छित असेल.
दरम्यान, यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया डे-नाईट कसोटी सामनाही खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यापूर्वी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वेळापत्रक जाहीर केले होते. ऑस्ट्रेलियन सरकारही हे खेळ पुनर्संचयित करण्यासाठी काम करीत आहे. तेथे काही नियम बनवून मैदानी खेळ सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारने काही नियमांमध्ये शिथिलता दिली आहे.