ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या सिडनी (Sydney) येथे पोहचला असून क्वारंटाइन राहत सराव सुरु केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोशल मीडियावर टीम इंडियाच्या खेळाडूंचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. विशेषत: व्हिडिओच्या सुरुवातीला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सरावादरम्यान स्लिप कॅचचा सराव करताना दिसत आहे. कोहलीने त्याच्या स्लिप कॅचचा सराव करताना शानदार कॅच घेतला, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. कोहलीसोबत चेतेश्वर पुजारा देखील स्लिप कॅच पकडण्याचा सराव करताना दिसत आहे. "टीम इंडिया परत मैदानावर परतली आहे आणि आम्ही आमचे लक्ष फिल्डिंगकडे वळविले आहे," पोस्टवरील कॅप्शनमध्ये लिहिले. (IND vs AUS 2020-21: भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया येथे सुरु केले मैदानी प्रशिक्षण, Gym मधेही घाळला घाम, पाहा Photos)
व्हिडिओच्या सुरुवातीला पुजारा आणि कोहली कॅच पकडण्याचा सराव करताना दिसतात. कोहलीने त्याच्या उजव्या हाताला उडी मारून एकहाती कॅच पकडत सुरवात केली, त्यानंतर पुजाराने कर्णधाराच्या कामगिरीची पुनरावृत्ती करत लो कॅच पकडला. उर्वरित व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडू रनिंग कॅच आणि अन्य सराव सत्रात भाग घेताना दिसले. ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर चेंडू अधिक उसळदार असल्यामुळे स्लिपमध्ये जास्तीत जास्त कॅच घेतले जातात. यामुळेच भारतीय संघाचे खेळाडूही स्लिप कॅचचा जोरदार सराव करत आहेत. पाहा व्हिडिओ:
View this post on Instagram
टीम इंडिया 12 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे दाखल झाले जिथे ते वास्तव्य करत आहेत. येथून त्यांचा ऑस्ट्रेलियाचा प्रवास सुरु होईल. 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेने दौऱ्याला सुरुवात होईल. मार्च महिन्यात कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे दक्षिण आफ्रिकेचा भारत दौऱ्यावरील टी-20 मालिका स्थगित केल्यानंतर भारताची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाईल. या दौर्याचा एकदिवसीय आणि टी-20 सामना सिडनी आणि कॅनबेरा येथे आयोजती केला जाईल, तर पहिली कसोटी सामना 17 डिसेंब रोजी अॅडिलेड येथे डे-नाईट कसोटी मालिका खेळली जाईल. ही मालिका दिवस/रात्र खेळली जाईल.