IND vs AUS 2020-21: भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया येथे सुरु केले मैदानी प्रशिक्षण, Gym मधेही घाळला घाम, पाहा Photos
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियामध्ये सराव (Photo Credit: Twitter/BCCI)

India tour of Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध बहुप्रतिक्षित मालिकेसाठी सिडनी (Sydney) येथे उतरल्यानंतर 48 तासांनंतर टीम इंडिया (Team India) खेळाडूंनी मार्चनंतर पहिल्या आंतरराष्ट्रीय मालिकेच्या तयारीला सुरुवातीसाठी मैदानी प्रशिक्षण सुरु केले आणि जिम मधेही घाम गाळला. युएईमध्ये असताना खेळाडू आधीच बायो-बबलमध्ये असल्याने त्यांना जवळजवळ दोन दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगितले. मार्च महिन्यानंतर हे टीम इंडियाचे पहिले मैदानी सत्र होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज झालेल्या सराव सत्राची झलक ट्विटरवरून शेअर केली. टीम इंडियाचे (Indian Cricket Team) सदस्य सिडनीमध्ये आहेत. नियमांनुसार, सराव सत्र पाहण्यास कोणत्याही बाहेरील व्यक्तीस परवानगी नाही. इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या समारोपानंतर दुबई ते सिडनी अशा लांब उड्डाणानंतर "शरीराची हालचाल करण्यासाठी" खेळाडूंनी धावणाऱ्या ड्रिलमध्ये भाग घेतला. (India Tour of Australia 2020-21: विराट कोहली खेळणाऱ्या एकमेव अ‍ॅडिलेड टेस्टच्या तिकिटांना मोठी मागणी)

“विमान प्रवासानंतर दोन दिवस आणि टीम इंडियाचे आज पहिले मैदानी सत्र झाले. शरीराची हालचाल करण्यासाठी थोडे धावणे!" बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केले. मैदानावर उतरण्यापूर्वी खेळाडूंनी जिम सत्रात घाम गाळला. आयपीएल 2020 मध्ये जवळपास दोन महिने एकमेकांविरुद्ध खेळल्यानंतर फिरकी जोडी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव देखील एकत्र आल्याने चांगल्या मूडमध्ये दिसले. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, हनुमा विहारी मैदानात धावताना तर दीपक चाहर, चेतेश्वर पुजारा, टी नटराजन, श्रेयस अय्यरसह अन्य खेळाडू जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. पाहा हे फोटोज:

27 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे होणार्‍या पहिल्या वनडे सामन्यातून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यास प्रारंभ होईल. दुसरा वनडे सामना देखील त्याच मैदानावर खेळला जाईल, तर नंतर ते अंतिम वनडे आणि पहिल्या टी-20 साठी कॅनबेरा येथे रवाना होतील. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी ते पुन्हा सिडनी येथे दाखल होतील. दरम्यान, कसोटी संघातील खेळाडू कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सिडनी येथे दोन चार-दिवसीय टूर सामना खेळतील. पहिला कसोटी सामना अ‍ॅडिलेड येथे 17 डिसेंबरपासून सुरु होईल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी भारतात परतेल. मेलबर्न दुसर्‍या कसोटी सामन्याचे तर सिडनी व ब्रिस्बेन तिसर्‍या आणि चौथ्या कसोटी सामन्याचे आयोजन केले जाईल.