India Tour of Australia 2020-21: विराट कोहली खेळणाऱ्या एकमेव अॅडिलेड टेस्टच्या तिकिटांना मोठी मागणी, प्रत्येक दिवशी 27,000 प्रेक्षकांनाच परवानगी
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तिकिटांची मागणी वाढली आहे. मालिकेचा हा पहिला कसोटी सामना डे/नाईट अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाईल. विराट कोहली खेळणारा हा एकमेव कसोटी सामना आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पाच दिवसांच्या प्रत्येक दिवशी एकूण 27,000 प्रेक्षकांना परवानगी स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्याची संधी मिळेल.
India Tour of Australia 2020-21: भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या कसोटी सामन्यासाठी तिकिटांची मागणी वाढली आहे. मालिकेचा हा पहिला कसोटी सामना डे/नाईट अॅडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे खेळला जाईल. विराट कोहली (Virat Kohli) खेळणारा हा एकमेव कसोटी सामना आहे. बीसीसीआयने (BCCI) विराटची पॅटर्निटी राजा मंजूर केली असल्याने विराट फक्त या एकमेव कसोटी सामन्यात झळकणार आहे. पहिल्या सामन्यानंतर विराट आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी मायदेशी परतणार आहे. मेलबर्नस्थित (Melbourne) कॅफेचे मालक अंगदसिंह ओबेरॉय, जे भारतीय क्रिकेटचा चाहता गट स्वामी आर्मी चालवतात, तिकिटांचे वितरण करीत आहेत आणि ग्रुपवर पहिल्या सामन्यासाठी तिकिटांची मोठी मागणी आहे. (IND vs AUS 2020-21: ‘मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू’, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगरने केले विराट कोहलीचे कौतुक)
सिडनी मॉर्निंग हेराल्डने ओबेरॉयचा हवाला देत म्हटले की, “डे नाईट टेस्ट मॅचसाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या कसोटीसाठीच्या तिकीटांना मागणी वाढली आहे. मागणी वाढली असली तरी, लॉजिस्टिक्स व टिकटींगची कामे एकत्र येण्यात अडचणी येत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी आमचे बोलणे सुरू आहे. आम्ही 25,000 तिकीटांची मागणी केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला आहे मात्र, पुढे काय होईल ते माहित नाही.” दरम्यान, कोहली कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांना मुकणार असला तरी तो तीन वनडे आणि तितक्याच टी-20 सामन्यांमध्ये खेळेल, ज्या कसोटी सामन्यापूर्वी खेळल्या जातील. 17 ते 21 डिसेंबर दरम्यान पिंक-बॉल टेस्ट खेळला जाईल.
पहिल्या कसोटी सामन्याच्या पाच दिवसांच्या प्रत्येक दिवशी एकूण 27,000 प्रेक्षकांना परवानगी स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्याची संधी मिळेल. त्यांनतर 26 ते 30 डिसेंबर होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी व्हिक्टोरियन सरकारने प्रत्येक दिवशी 25,000 प्रेक्षकांसाठी परवानगी दिली आहे. 7 ते 11 जानेवारीपासून सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टेडियमच्या 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल. अखेरीस 30,000 चाहते प्रत्येक दिवशी ब्रिस्बेनच्या गब्बा येथे होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याचा आनंद लुटू शकतात.
(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2020 01:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

