IND vs AUS Test 2020-21: भारतीय फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मर्यादित ओव्हरच्या मालिकेला मुकलेला रोहित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) अंतिम दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळणे अपेक्षित आहे. रोहितने इंस्टाग्रामवर जाऊन एका मोहक फोटो शेअर करत ऑस्ट्रेलियामध्ये आगमनाची घोषणा केली. फोटोमध्ये रोहित विचार करत आपल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघताना दिसत आहे. त्याने 'डे वन वन' असे फोटो कॅप्शन टाकलं, ज्यामध्ये तो क्वारंटाइनमध्ये असल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्यावर 14 दिवस क्वारंटाइन राहिल्यावर 'हिटमॅन' भारतीय संघात (Indian Team) सामील होईल. कसोटी मालिकेत रोहितच्या खेळण्यावर निश्चितता नसल्याने स्टार सलामीवीर डाऊन अंडर पोहचताच हिटमॅन चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. (IND vs AUS Test 2020-21: बॉक्सिंग डे टेस्ट खेळण्यास डेविड वॉर्नर उत्सुक, भारताविरुद्ध पूनरागमना संदर्भात केला 'हा' दावा)
रोहितला इंडियन प्रीमियर लीग दरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापत झाली ज्यामुळे त्याला आयपीएलमधील काही सामन्यांना मुकावे लागले. त्याने प्ले-ऑफ आणि फायनलमध्ये मुंबई इंडियन्सचे विजयी नेतृत्व केले, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेतून त्याला वगळले गेले. मात्र, त्याचा कसोटी संघात समावेश झाला असला तरी तो संघासोबत ऑस्ट्रेलियाचा रवाना न होता भारतात परतला. नंतर, रोहितला आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी गेला असल्याने बीसीसीआयने घड केले आणि त्यानंतर मुंबईकर फलंदाज पुनर्वसन व फिटनेस परत मिळवण्यासाठी एनसीएमध्ये जाणार असल्याचे सांगितले. तथापि, त्याने 11 डिसेंबर रोजी फिटनेस टेस्ट पास केली आहे आणि क्वारंटाइन कालावधी पूर्णकेल्यावर अन्य संघ खेळाडूंसोबत राहण्यास पात्र ठरेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाइनच्या पहिल्या दिवसाच्या रोहितच्या 'या' फोटोकडे पाहा:
दुसरीकडे, अॅडिलेडमधील पहिल्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉची सलामी जोडी अपयशी ठरली तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातील ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत भारताचा पहिला डाव 244 धावांवर संपुष्टात आणला. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्या वेगवान हल्ल्यापुढे भारतीय फलंदाज ढेर झाले. पुजारा, कोहली आणि रहाणेला वगळता अन्य फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकला नाही.