IND vs AUS 2020-21: ‘विराट कोहलीचा द्वेष करायला आवडतं, पण फॅन म्हणून त्याची फलंदाजी आवडते’, ऑस्ट्रेलियाई कर्णधार टिम पेनचे विधान
टिम पेन आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

IND vs AUS 2020-21: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील (India Tour of Australia) मालिकेला अवघ्या काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. गुरुवारी सिडनी येथे दाखल झाल्यावर भारतीय संघाने (Indian Team) आज मैदानी सरावाला सुरुवात केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधार टिम पेनने (Tim Paine) प्रतिस्पर्धी भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) त्याच्या देशातील Polarising व्यक्तिमत्त्व म्हणून संबोधले आहे ज्याचा ऑस्ट्रेलियाचा संघ द्वेष करतो, पण त्याला फलंदाजी करताना पाहायलाही आवडते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे मालिका, तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पेन ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहेत तर कोहली मर्यादित षटकांच्या दोन्ही मालिकेत आणि मायदेशी परण्यापूर्वी पहिल्या कसोटीत नेतृत्व भारताचे करेल. (IND vs AUS 2020-21: भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया येथे सुरु केले मैदानी प्रशिक्षण, Gym मधेही घाळला घाम, पाहा Photos)

“मला विराट कोहलीबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात, तो माझ्यासाठी फक्त दुसऱ्या खेळाडूसारखा आहे, यामुळे मला खरोखर त्रास होत नाही. त्याच्या बरोबर खरंच नातं जुळण्यासारखं नाही. मी टॉसमध्ये त्याला पाहतो आणि त्याच्याविरूद्ध खेळतो आणि एवढंच,” पेनने ABC Sportला सांगितले. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पुढे म्हणाला की, “विराट बाबत मजेशीर गोष्ट अशी की आम्हाला त्याचा तिरस्कार करायला आवडतो, पण त्याचबरोबर आम्हाला चाहता म्हणून त्याची फलंदाजी पहायलाही आवडते. आम्हाला त्याची फलंदाजी आवडते पण आम्हाला त्याने खूप साऱ्या धावा केलेल्या पहायला आवडत नाही.”

पेनने हे देखील स्पष्ट केले की कोहलीच्या आक्रमकतेसह त्याचा संघ अपवाद करत नाही.जेव्हा आक्रमकतेबद्दल बोलले जाते तेव्हा कोहलीसह त्याचा संघ देखील अपवादास्पद नाही. तो पुढे म्हणाला की ऑसीज कुणाबरोबरही असेच करतील. “ऑस्ट्रेलिया आणि भारत ही एक तीव्र स्पर्धा आहे आणि तो साहजिकच प्रतिस्पर्धी व्यक्ती आहे आणि मीही आहे. असे काही प्रसंग होते जेव्हा आम्ही शाब्दिक चकमकी घडल्या हे सर्व आम्ही दोघेही कर्णधार आहोत म्हणून झाले नाही, तिथे कोणीही असतं तरी या घटना घडल्या असत्या.”