IND vs AUS 2020-21: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौर्‍याचे जाहीर केलेले वेळापत्रक अंतिम नाही, BCCI ने दिले महत्वाचे संकेत
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Getty)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) गुरुवारी मेगा वेळापत्रक जाहीर केले. या दरम्यान ऑस्ट्रेलिया भारत (India), अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि टी-20 विश्वचषकचे आयोजित करणार आहेत. करोनाच्या तडाख्यामुळे गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. याच दरम्यान भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे (India Tour of Australia) वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा येत्या ऑक्टोबरपासून सुरु होईल. यादरम्यान ते टी-20 मलिका, टी-20 वर्ल्ड कप, कसोटी आणि टेस्ट मालिकेत खेळतील. पण एका कारणामुळे अद्याप ऑस्ट्रेलिया दौऱ्या निश्चित नसल्याचे बीसीसीआयकडून (BCCI)सांगण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घोषित केलेल्या वेळापत्रकावर भाष्य करताना बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल (Arun Dhumal) म्हणाले की, ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषक (World Cup) स्पर्धेचे आयोजन करणार नसल्यास भारतीय दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल केले जातील. (IND vs AUS 2020-21: टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20, वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर; पाहा कधी आणि कुठे होणार सामने)

न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना धुमल म्हणाले “ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम हा खूप आधी ठरवण्यात आला होता. त्यावेळी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्याबाबत कोणतीही साशंकता नव्हती, पण आता जर आयसीसी यंदा वर्ल्ड कपचे आयोजित करणार नसेल, तर ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात जाऊन परत येणे आणि परत डिसेंबरला ऑस्ट्रेलियात जाणे या प्रवासाला काय अर्थ आहे?” “त्यांनी हे वेळापत्रक आखले आहे. यजमान देश असल्याने त्यांना हे फायनल करावे लागेल जेणेकरुन प्रसारक आणि इतर देखील त्यांच्या योजना तयार करु शकतील. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अजून चार-पाच महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत काय घडतं त्यावर सगळं अवलंबून आहे. सध्या तरी कोणताही दौरा रद्द झालेला नाही,” असेही धुमल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अद्याप चार-पाच महिने बाकी आहे. यापूर्वी भारतीय संघ श्रीलंका दौर्यावरही जाणार आहे. दुसरीकडे, टी-20 वर्ल्ड कप स्थगित देखील झाले तर टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौरा करणार असल्याची खात्री आहे. धुमल यांनी यापूर्वी लीकडेच सांगितले होते की जर खेळाडूंना करण्यास सांगितले गेले तर त्यांना दौऱ्यावर स्वतःला 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करावे लागेल. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 42 लाख डॉलर्सच्या नवीन हॉटेलमध्ये तयारी करत आहे. टी -20 वर्ल्डकपच्या भविष्यावर आयसीसीने अंतिम निर्णय दिल्यानंतर या दौऱ्याबाबतचे स्पष्ट चित्र समोर येईल.