आयसीसीचे माजी पंच स्टीव्ह बकनर (Steve Bucknor) यांनी शेवटी 2008 भारत (India) आणि ऑस्ट्रेलियामधील (Australia) सिडनी कसोटीत (Sydney Test) केलेल्या चुकांची कबुली दिली. बकनर यांच्या चुकीच्या निर्णयाने यजमान ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकण्यास मदत केली. बकनर आणि मार्क बेन्सन, या सामन्याचे ऑन-फिल्ड अंपायर्सची कामगिरी बजावली आणि भारताविरुद्ध काही चुका केल्या ज्यामुळे पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतरही त्यांना 122 धावांना पराभवाला सामोरे जावे लागले. मिड-डे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बकनर यांनी आपल्या दोन चुकांमुळे भारताला कसोटी सामना गमवावा लागला हे मान्य केलं आहे. अंपायरकडून चुकीचे निर्णयांव्यतिरिक्त अँड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंहमधील ‘मंकीगेट’ प्रकरणामुळे ही मालिका चांगलीच गाजली होती. आयसीसीने हस्तक्षेप करण्यापूर्वी आणि टीम इंडियाने या दौर्यावरुन माघार घेण्याची धमकी दिल्यामुळे दोन्ही संघांमध्ये कटुता निर्माण झाली होती.
आणि आता वादग्रस्त कसोटीच्या 12 वर्षानंतर, बकनरने शेवटी दोन चुका केल्याची कबुली दिली ज्यामुळे "कदाचित भारताला सामना करावा लागला". (आकाश चोपडा म्हणाले बेन स्टोक्स सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, शाकिब-अल-हसन दुसरा तर भारताचा रवींद्र जडेजा जगातील तिसरा, जाणून घ्या यामागचे कारण)
“2008 सिडनी कसोटीत मी दोन चुका केल्या. पहिली चूक, जेव्हा भारत चांगली कामगिरी करत होता तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाला शतक झळकावण्याची संधी दिली. दुसरी चूक, पाचव्या दिवशी ज्यामुळे कदाचित भारताने सामना गमावला. पण तरीही या दोन चुका मला आयुष्यभर सतावत राहणार आहेत.” आपल्या कारकिर्दीतबकनरवादग्रस्त निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध होते. 2008 सिडनी कसोटी सामन्यात भारताकडून सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांना बकनर यांच्या चुकीच्या निर्णयाचं बळी ठरावलं, तर सायमंड्स आणि रिकी पॉन्टिंग बाद असतानाही त्यांना नाबाद देण्यात आलं.
या सामन्यात भारतीय संघाने बकनर आणि बेन्सनच्या अम्पायरिंगविरुध्द तक्रार केली आणि ज्यामुळे पर्थ येथे पुढील कसोटी सामन्यात त्यांची हकालपट्टी झाली. या सामन्यात भारताने 72 धावांनी सामना जिंकला, पण अॅडिलेड येथील सामना ड्रॉ झाल्याने ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका जिंकली.