वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात 176 धावांच्या शानदार खेळीसह इंग्लंडच्या बेन स्टोक्सने त्याच्या सक्षमतेची एक झलक दाखविली. स्टोक्स मागील काही सामन्यातून फलंदाजी आणि चेंडू दोघांनीही जबरदस्त खेळ करत आहे. प्रत्येकजण त्याचे गुणगान करीत आहे. वनडे वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिकेत इंग्लंडचा नायक असल्याचे त्याने सिद्ध केले. आणि आता वेस्ट इंडीजविरूद्धही चेंडू आणि फलंदाजांने त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. या दरम्यान, माजी भारतीय सलामी फलंदाज आकाश चोपडा यांनी त्याला जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून संबोधले. ते म्हणाले की, इंग्लंडचा बेन स्टोक्स सध्या प्रत्येक फॉर्मेटमध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा अष्टपैलू आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरु असलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात स्टोक्सने 176 धावांच्या डावासह टीमला मोठ्या स्कोर पर्यंत नेले. "या वेळी माझ्या मनात शंका नाही की बेन स्टोक्स हे तिन्ही फॉर्मेट्समध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे," असे चोपडा म्हणाले. गेल्या दोन वर्षांत कसोटीत त्याची सरासरी 43, टी-20 ची सरासरी 33 आणि वनडे सामन्यात 59 आहे, चोपडा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाले. (ENG vs WI 2nd Test: बेन स्टोक्स याने टेस्ट सामन्यात टी-20 स्टाईलमध्ये असा मारला षटकार; खेळला 176 धावांचा विक्रमी डाव)
आकाशने पुढे सांगितले की, “सर्व फॉर्मेटमध्ये त्याची गोलंदाजीची चांगली सरासरी आहे. सर्व फॉर्मेट्समध्ये स्टोक्स जगातील प्रथम क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे यात शंका नाही.” शिवाय चोपडाने बांग्लादेशचा माजी कर्णधार शाकिब-अल-हसनला दुसर्या क्रमांकाचा आणि भारताचा रवींद्र जडेजाला सध्या जगातील तिसर्या क्रमांकाचा अष्टपैलू म्हणून निवडले. ते म्हणाले, "रवींद्र जडेजा सर्वोत्तम होण्याच्या मार्गावर आहे परंतु तो अद्याप तिथे पोहोचलेला नाही. शाकिब तिथे आहे पण मला वाटत नाही की त्याच्याशिवाय कोणीही येऊ शकेल."
दरम्यान, स्टोक्सच्या शतकी डावाच्या जोरावर इंग्लंडने पहिला डाव 469 धावांवर घोषित केला. 176 धावांच्या खेळीत स्टोक्सने 356 चेंडूंचा सामना केला आणि 17 चौकारांसह दोन षटकार ठोकले. साउथॅम्प्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडला चार विकेटने पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, दुसऱ्या सामन्यात विंडीज टीमची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 32 धावांवर 1 विकेट गमावली, तर तिसऱ्या दिवशी आनंदाची बाब म्हणजे पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ वाया गेले, त्यामुळे विंडीजला आता चौथ्या आणि पाचव्या दिवशी सामना ड्रॉ करण्याची संधी मिळेल.