IND vs AUS 1st Test Day 2: जसप्रीत बुमराहचा दबदबा, मॅथ्यू वेड- जो बर्न्स यांच्या संथ सुरुवातीनंतर Dinner पर्यंत ऑस्ट्रेलिया 2 बाद 35 धावा
जसप्रीत बुमराह (Photo Credits: Getty Images)

IND vs AUS 1st Test Day 2: अ‍ॅडिलेड (Adelaide) पिंक-बॉल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीच्या (Virat Kohli) भारतीय संघाचा (Indian Team) पहिला डाव 244 धावांवर आटोपल्यावर यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्या दिवसाच्या रात्रीच्या जेवणापर्यंत 2 विकेट गमावून 35 धावा केल्या आहेत. 19 ओव्हरचा खेळ झाला असून स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) नाबाद 1 आणि मार्नस लाबूशेन (Marnus Labuschgne) नाबाद 16 धावा करून खेळत आहेत. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियावर आपला दबदबा कायम ठेवत मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि जो बर्न्सच्या (Joe Burns) सलामी जोडीला माघारी धाडलं.भारताने दुसऱ्या दिवशी 233 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली आणि 10 अधिक धावा करून 244 पर्यंत मजल मारू शकली. भारताकडून कर्णधार कोहलीने सर्वाधिक 74 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा 43 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 42 धावा केल्या. पुजारा आणि रहाणेने चांगली सुरुवात केली पण मोठा डाव खेळू शकले नाही. (IND vs AUS 1st Test Day 2: टीम इंडिया 244 धावांवर ऑलआऊट, मिचेल स्टार्क-पॅट कमिन्सचा भेदक मारा)

दुसऱ्या दिवशी भारताला ऑलआऊट करत ऑस्ट्रेलियासाठी जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड यांनी डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांना चार ओव्हरपर्यंत एकही धाव करता आली नाही. 4.4 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने आपलं खातं उघडलं. दोन्ही फलंदाज संथ खेळी करत होते. भारताकडून बुमराहने पहिल्या दोन विकेट घेत कांगारू संघाच्या अडचणीत वाढ केली. वेड आणि बर्न्स प्रत्येकी 8 धावा करून माघारी परतले. दरम्यान, भारताने पहिल्या दिवशी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण सलामी जोडी प्रभावी सुरुवात करून देण्यास अपयशी ठरली. पृथ्वी शॉ शून्यावर तर मयंक अग्रवाल 17 धावाच करू शकला. त्यानंतर कोहलीने पहिले पुजारा आणि नंतर रहाणेसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पुजाराने कोहलीसोबत 68 धावांची भागीदारीत करत संघाला शंभरी गाठून दिली, तर कोहली आणि रहाणेने धावसंख्या दोनशेच्या जवळ पोहचवली. मधल्या फळीत हनुमा विहारी आणि रिद्धिमान साहा देखील मोठी खेळी करू शकले नाही. कर्णधार कोहली बाद झाल्यावर भारतीय अवघ्या 56 अधिक धावा करून ऑलआऊट झाला.

ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कने 4 विकेट घेतल्या तर पॅट कमिन्सला 3 विकेट मिळाल्या. जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.