IND vs AUS 1st Test Day 2: टीम इंडिया 244 धावांवर ऑलआऊट, मिचेल स्टार्क-पॅट कमिन्सचा भेदक मारा
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test Day 2: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) अ‍ॅडिलेड ओव्हलच्या (Adelaide Oval) पहिल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय संघ (Indian Team) दुसऱ्या दिवशी 244 धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या दिवशी भारताने 233 पासून खेळायची सुरुवात केली आणि फक्त 10 अधिक धावाच करू शकली. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत टीम इंडियासाठी कर्णधार विराटने सार्वधिक 74 धावांची खेळी केली. शिवाय, चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) 43 तर कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) 42 धावांचे योगदान दिले. पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल सलामीला आले, मात्र प्रभावी सुरुवात करून देण्यास ते अपयशी ठरले व स्वस्तात माघारी परतले. पृथ्वीला मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) भोपळा फोडू दिला नाही तर मयंकने 17 धावा केल्या. मधल्या फळीत हनुमा विहारीने 16 धावाच करता आल्या तर रविचंद्रन अश्विनने 15 धावा करून माघारी परतला. ऑस्ट्रेलियासाठी स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. पॅट कमिन्सला 3 तर जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 1st Test: अ‍ॅडिलेडमध्ये 'या' भारतीय फलंदाजाच्या विकेटने बदलले सामन्याचे चित्र, ऑस्ट्रेलियन नॅथन लायनने मॅचचा टर्निंग पॉईंट)

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली. सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यावर पुजारा आणि विराटने अर्धशतकी भागीदारी करत कांगारू गोलंदाजवर वर्चस्व गाजवले. मात्र, पुजाराला अर्धशतक पूर्ण करू न देता लायनने माघारी धाडलं. त्यानंतर कर्णधार कोहली उपकर्णधार रहाणेची भागीदारी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरत असताना धाव घेण्याच्या प्रयत्नात विराट धावबाद होऊन माघारी परतला. कोहलीनंतर रहाणेला स्टार्कने पायचीत करून संघाला मोठे यश मिळवून दिले. विहारी देखील खास कामगिरी करू शकला नाही आणि हेझलवूडच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला. साहा आणि अश्विनच्या जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अश्विन आणि पुढील ओव्हरमध्ये साहा स्वस्तात आऊट झाला. उमेश यादवने 6 धावा केल्या.

पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराटची विकेट ऑस्ट्रेलियासाठी महत्वाची ठरली. कोहली आणि रहाणे संघासाठी मोठी धावसंख्या उभारतील असे दिसताना हेझलवूडने संधीचा फायदा घेत भारतीय कर्णधाराला धाव घेण्याच्या गोंधळात धावबाद केलं आणि संघाने मोकळा श्वास घेतला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी कॅमरुन ग्रीनने पदार्पणाच्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली. ग्रीनला एकही विकेट मिळाली नसली तरी त्याने 9 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा दिल्या.