Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final 2023) टीम इंडियाचा (Team India) दारूण पराभव झाल्यापासून कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) जोरदार टीका होत आहे. तथापि, रोहित शर्मा हा विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत (किमान 50 सामने) टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माची विजयाची टक्केवारी 73.80 आहे. आतापर्यंत रोहित शर्माने 84 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्यापैकी 62 सामने त्याने जिंकले आहेत. त्याचबरोबर त्यांने 21 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना ड्रॉही झाला आहे.

विराट कोहलीने कर्णधार म्हणून 135 सामने जिंकले आहेत

या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 213 पैकी 135 सामने जिंकले आहेत (63.38 टक्के) आणि 60 गमावले आहेत. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. (हे देखील वाचा: IND vs WI: हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता, पुढील आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची होवु शकते घोषणा)

महेंद्रसिंग धोनीने 332 पैकी 178 सामने जिंकले आहेत (53.61 टक्के) आणि 120 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. 6 सामने टाय झाले असून 15 अनिर्णित राहिले आहेत. या यादीत सौरव गांगुली चौथ्या क्रमांकावर आहे. सौरव गांगुलीने 195 सामन्यामध्ये कर्णधारपद भूषवले आहे, त्यापैकी 97 सामन्यांमध्ये त्याने (49.74 टक्के) विजय मिळवला आहे. त्याचवेळी त्यांना 78 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असून 15 सामने बरोबरीत आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या मोसमाचा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 212 धावांनी पराभव करत WTC च्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. अशा प्रकारे टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य होते, मात्र संपूर्ण संघ केवळ 234 धावांवरच गारद झाला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियन संघाने प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम विजेतेपद पटकावले.