Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. त्याचबरोबर डब्ल्यूटीसी फायनल 2023 मध्ये (WTC Final 2023) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारताला वेस्ट इंडिजला (IND vs WI) जावे लागणार आहे. जिथे पुढील महिन्यात जुलैमध्ये भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसह एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. पण या सगळ्याच्या दरम्यान, स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत (IND vs WI) पुनरागमन करू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. (हे देखील वाचा: JioCinema ला मिळाले India's Tour of West Indies 2023 चे डिजिटल राईट्स)

हार्दिक पांड्याला दिली जावु शकते संधी

विशेष म्हणजे बीसीसीआय पुढील आठवड्यात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्याला कसोटी संघात संधी दिली जाऊ शकते. त्याच वेळी, डब्ल्यूटीसी अंतिम 2023 मधील पराभवानंतर, भारतीय निवडकर्ते संघातील जुन्या खेळाडूंच्या जागी नवीन खेळाडूंचा समावेश करण्याचा विचार करत आहेत. हार्दिकने अखेरचे कसोटी क्रिकेटमध्ये 2018 साली इंग्लंड दौऱ्यात पुनरागमन केले होते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “हार्दिक पांड्याला नक्कीच एक पर्याय आहे, पण हार्दिकला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी दिली जाऊ शकते. कारण भारतीय निवडकर्त्यांना त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना पाहायचे आहे. पण क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो खेळू शकतो हे पाहावे लागेल.

कसोटीत पुनरागमन करण्याबाबत हार्दिकचे विधान

डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी हार्दिक म्हणाला, “जर मला कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर मी त्यासाठी कठोर परिश्रम करेन आणि त्यानंतर मी पुनरागमन करेन. या कारणास्तव, अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर, जोपर्यंत मला वाटत नाही की मी माझे स्थान मिळवले आहे तोपर्यंत मी उपलब्ध होणार नाही किंवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल किंवा भविष्यातील कोणत्याही कसोटी सामन्यात खेळणार नाही."