Five Sixes In An Over In IPL:  केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर 'या' खेळाडूनेही एका ओव्हरमध्ये ठोकले आहेत 5 षटकार
राहुल तेवतिया (Photo Credit: Twitter/rajasthanroyals)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020) स्पर्धा यावर्षी युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून या स्पर्धेतील नववा सामना राजस्थान रॉयल विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात पार पडला. दरम्यान, राजस्थान रॉयल संघाचा फलंदाज राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकून सामन्याचे चित्रच पालटले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. मात्र, आयपीएलमध्ये केवळ राहुल तेवतिया हाच नव्हेतर आणखी एका खेळाडूने एका षटकात 5 षटकार ठोकले आहेत. तर, जाणून घेऊया त्या खेळाडूबाबत.

आयपीलएलच्या 13 व्या मोसमातील 9वा साखळी सामना हा कधीही न विसरणारा असणार आहे. यामध्ये पंजाबच्या तोंडचा विजय राजस्थानने हिसकावून घेतला. या विजयात राजस्थानच्या अष्टपैलू राहुल तेवतियाने गेमचेंझरची महत्वाची भूमिका निभावली. राजस्थानने फक्त हा सामनाच जिंकला नाहीतर इतिहासही रचला आहे. राजस्थानने आयपीएलमधील सर्वात जास्त धावांचा यशस्वीपणे धावांचा पाठलाग केला आहे. हे देखील वाचा-Rohit Sharma May Set New Record: आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पा गाठल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणखी एका विक्रमापासून केवळ 10 धावा दूर

1) राहुल तेवतिया-

आयपीएल तेराव्या हंगामात राहुल तेवतियाने किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्याविरोधात आक्रमक खेळी केली. त्याने पंजाबच्या संघासाठी 18 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या शेल्डन कोट्रेलच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकले आहेत. यामुळे क्रिडाविश्वातून त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे.

2) क्रिस गेल-

एका ओव्हरमध्ये पाच षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस गेल याचाही समावेश आहे. क्रिस गेलने आयपीएलच्या आठव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळरुच्या संघाकडून खेळत पुणे वॉरियर्स संघाच्या विरुद्ध आक्रमक खेळी केली होती. त्यावेळी क्रिस गेल सर्वाधिक 175 धावा केल्या होत्या. तसेच पुण्याच्या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या राहुल शर्माला एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकले होते.