(Photo Credits: Cricket South Africa)

भारतात इंडियन प्रीमिअर लीगला (IPL) अतिशय लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखले जाते. या स्पर्धेचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंसाठी आयपीएल स्पर्धा चांगला प्लॅटफॉर्म ठरत आहे. दरम्यान, आयपीएलच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखवणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना आतंराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतर चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची नवी ओळखदेखील बनवली आहे. परंतु, क्रिकेटविश्वात असे तीन खेळाडू आहेत, ज्यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळताना मैदान गाजवले आहे. परंतु, आयपीएलमध्ये त्यांना काही खास कामगिरी करता आली नाही.

सौरव गांगुली- 

भारतीय क्रिकेट संघाला यशाच्या दिशेने घेऊन जाणारा माजी कर्णधार सौरव गांगुलीने देशासाठी 311 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी त्याने 300 डावामध्ये 11 हजार 363 धावा केल्या आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत त्यांच्या नावावर 22 शतक आणि 72 अर्धशतके आहेत. याशिवाय, कसोटी क्रिक्रेटमध्ये त्यांनी 113 सामने खेळले आहेत. त्यापैकी 188 डावात 42.2 च्या सरासरीने 7 हजार 212 धावा केल्या आहेत. परंतु, आयपीएलमध्ये त्यांना काही खास कामगिरी करता आली नाही. गांगुलीने आयपीएलमध्ये अनेक संघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु, त्यांनी 59 सामन्यात 25. 4 सरासरीने 1 हजार 349 धावा केल्या आहेत. सौरव गांगुली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटच्या तुलनेत आयपीएलमधील कामगिरी निराशाजनक आहे.

चेतेश्वर पुजारा-

कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघासाठी मोलाचा वाटा उचलणारा चेतेश्वर पुजाराचाही या यादीत समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रमाला गवसणी घालणारा चेतेश्वर पुजारा आयपीएलमध्ये मात्र प्लॉप ठरला आहे. पुजाराने आयपीएलच्या 30 सामन्यातील 22 डावात 20.5 च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. पुजाराला आयएलमध्ये केवळ एकच अर्धशतक ठोकता आले आहे. हे देखील वाचा- Naman Ojha Announces Retirement: भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज नमन ओझाने केली निवृत्तीची घोषणा; साश्रू नयनाने घेतला निरोप

माइकल क्लार्क-

या यादीत तिसऱ्या अखेरचे नाव ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मायकल क्लार्कचे आहे. क्लार्कने ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट मैदानात महत्वाचे योगदान दिले आहे. परंतु, आयपीएलमध्ये त्याला चांगली कामगिरी बजावता आली नाही. क्लार्कने आयपीएलमध्ये केवळ सहा सामने खेळून 16.3 सरासरीने 98 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये क्लार्कचा सर्वश्रेष्ठ स्कोर 41 आहे.

मायकल क्लार्कने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 115 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 198 डावात 8 हजार 643 धावा केल्या आहेत. तर, 245 एकदिवसीय सामन्यातील 223 डावात त्याने 44.6 च्या सरासरीने 7 हजार 981 धावा केल्या आहेत. याशिवाय टी-20 क्रिकेटमध्ये 34 सामन्यातील 28 डावात त्याने 21.2 च्या सरासरीने 488 धावा केल्या आहेत.