ICC WTC Final: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात साउथॅम्प्टन (Southampton) येथे 18 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल (World Test Championship Final) सामना ड्रॉ, अनिर्णित राहिल्यास किंवा पाऊस आल्यास काय होईल याबद्दल आयसीसी (ICC) लवकरच नियमावली जाहीर करेल. भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) साऊथॅम्प्टन येथील महाअंतिम सामन्यासाठी परिस्थिती संबंधित व इतर प्रश्नांच्या उत्तरांची आतुरतेने वाट पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) येत्या काही दिवसांत 'प्लेइंग कंडिशन्स' रिलीज करणे अपेक्षित आहे. “ही दुसरी द्विपक्षीय मालिका कसोटी सामना नसल्यामुळे आम्हाला खेळाच्या परिस्थितीविषयी माहिती असणे आवश्यक आहे. आम्हाला तीन मूलभूत पॉईंटर्स माहित असणे आवश्यक आहेत,” असे भारतीय संघाच्या आवश्यकतेबद्दल बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. “दोन्ही संघांचा किमान एक डाव पूर्ण न होता ड्रॉ, टाय किंवा अंतिम वॉश आउट झाल्यास काय होईल,” असेही ते पुढे म्हणाले. (ICC WTC Final: भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ड्रॉ किंवा बरोबरीत सुटल्यास कसा ठरणार विजेता संघ?)
“आयसीसी येत्या काही दिवसात खेळाच्या अटी प्रकाशित करणार आहे. आम्ही तारीख ठेवू शकत नाही पण माझा विश्वास आहे की ते लवकरच ठरतील.” पुढील महिन्याच्या सुरुवातील लंडनमध्ये दाखल झाल्यावर टीम इंडिया साऊथॅम्प्टनला रवाना होईल जिथे न्यूझीलंड विरोधात अंतिम सामन्यापूर्वी त्यांनी 10 दिवस क्वारंटाईन होणे अपेक्षित आहे. "होय, न्यूझीलंड आणि इंग्लंड दोन कसोटी सामन्यांपैकी पहिला कसोटी सामना खेळतील तेव्हाच भारत साऊथॅम्प्टनमध्ये दाखल होईल. आयसीसीने येत्या काही दिवसांत कठोर किंवा हलक्या क्वारंटाईनची कल्पना द्यावी अशी आम्ही अपेक्षा करतो. हा आयसीसीचा कार्यक्रम असल्याने त्यांच्याकडून अंतिम अधिसूचना येणे आवश्यक आहे,” असेही सूत्रांनी सांगितले. भारतीय संघ आपल्या नरम क्वारंटाईन दरम्यान प्रशिक्षण करण्याची अपेक्षा करत आहे परंतु या कालावधीच्या संदर्भात अद्याप बोलणी सुरू आहेत. मुंबईस्थित खेळाडू 24 मे रोजी स्थानिक बायो-बबलमध्ये दाखल होतील.
दरम्यान, मयंक अगरवाल, रविचंद्रन अश्विन, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण बुधवारी चेन्नईहून चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाले तर पुरुष संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर, महिला कसोटी आणि वनडे कर्णधार मिताली राज यांनी हैदराबाद येथून विमान बोर्ड केले. तथापि पुरुष, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा आणि महिला संघाची फलंदाज जेमिमाह रॉड्रिगज यांच्यासह मुंबई, पुणे व त्याच्या आसपासच्या भागात राहणारे सर्वजण24 मे रोजी संघाच्या बबलमध्ये दाखल होऊ शकतात. केएल राहुल देखील अॅपेंडिसाइटिस ऑपरेशनमधून बरे झाले असून तो 24 मे रोजी मुंबईत बबलमध्ये दाखल होऊ शकतो.