ICC WTC Final: भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ड्रॉ किंवा बरोबरीत सुटल्यास कसा ठरणार विजेता संघ? वाचा सविस्तर

भारत आणि न्यूझीलंड संघात होणाऱ्या पहिल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता असतानाही सामना अनिर्णित किंवा ड्रॉ झाल्यास काय होईल? आयसीसीच्या नियमांनुसार या अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डे 23 जून रोजी ठेवण्यात आला आहे. शिवाय, अंतिम सामना अनिर्णित किंवा ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

ICC WTC Final: भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ड्रॉ किंवा बरोबरीत सुटल्यास कसा ठरणार विजेता संघ? वाचा सविस्तर
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

What If WTC Final ends in Draw: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात होणाऱ्या पहिल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या या सामन्यासाठी एक महिण्याइतका कालावधी शिल्लक राहिला आहे. साउथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल (Ageas Bowl) स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडला जाण्यापूर्वी टीम इंडिया (Team India) आठ दिवस बायो बबलमध्ये राहील ज्याची सुरुवात येत्या 25 मे पासून होणार आहे. खेळाडूंसाठी इंग्लंडला जाण्यासाठी विशेष चार्टर्ड विमानाची सुविधा करण्यात येणार आहे. या सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता असतानाही सामना अनिर्णित किंवा ड्रॉ  झाल्यास काय होईल? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार या अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डे 23 जून रोजी ठेवण्यात आला आहे. शिवाय, अंतिम सामना अनिर्णित किंवा ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. (ICC WTC Final: न्यूझीलंडला धूळ चारण्यासाठी टीम इंडियासाठी हा खेळाडू ठरू शकतो ट्रम्प कार्ड, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघाना लोळवले आहे)

तथापि, खेळण्याच्या अटींमध्ये रिझर्व्ह डेचा पर्याय देखील आहे. कसोटी सामन्यात प्रत्येक नेट प्लेइंग वेळ 30 तासांचा असतो; दररोज सहा तास किंवा दररोज 90 ओव्हर्स. सहा तासांचा निर्धारित वेळ पूर्ण न झाल्यास किंवा दिवसाचे 90 ओव्हरहा कोटा पूर्ण न केल्यास राखीव दिवस लागू होईल. शिवाय, हवामानामुळे खेळ 5 दिवसात पूर्ण न झाल्यास राखीव दिवसाची तरतूद आयसीसी नियमात आहे. दरम्यान, यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानात खेळला जाणार होता पण नंतर तो एजस बाउल येथे हलवण्यात आला. विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंग्लंडचा घरच्या मालिकेत 3-1 असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. भारतीय संघापूर्वी , केन विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करून चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान निश्चित केलं होतं.

दुसरीकडे, अंतिम दोन संघ व ठिकाण ठरलं असलं तरी इंग्लंडमध्ये नेहमीच हवामान खराब होण्याची शक्यता असते. इंग्लंडमधील अप्रत्याशित हवामानामुळे बऱ्याचदा सामने पुढे ढकलल्या गेके किंवा रद्द करण्यात आले आहेत. 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी याचे उत्तम उदाहरण आहे जिथे पावसामुळे फायनल मॅचसह जवळजवळ सर्व सामने एकतर रद्द करावे लागले किंवा ओव्हर्स कमी कराव्या लागल्या. अशा स्थितीत देव न करो पहिल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यावर देखील जर पावसाचे सावट दिसले तर राखीव दिवस अमलात आणला जाईल.

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2021 10:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).