ICC WTC Final 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील बहुप्रतीक्षित आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. साउथॅम्प्टनमध्ये (Southampton) पावसाने विश्रांती घेतल्यावर सामन्याच्या दुसऱ्या दिवसापासून सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडने टॉस जिंकून टीम इंडियाला (Team India) पहिले बॅटिंग करण्यास सांगितले. भारतीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदासाठी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. टीम इंडियासमोर वेगवान किवी गोलंदाज कॉलिन डी ग्रॅन्डहोम (Colin de Grandhomme) गोलंदाजी करायला आला तेव्हा यूजर्सने त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. (IND vs NZ WTC Final 2021 Day 2: न्यूझीलंड गोलंदाजांचे शानदार कमबॅक, लंचपर्यंत टीम इंडिया 2 बाद 69 धावा)
भारतीय क्रिकेट प्रेमींनी त्याची तुलना बॉलीवूड अभिनेता संजय दत्तशी केली तर अनेकांचे असे मत होते की त्याने महाभारतातील कर्णची भूमिका बजावलेल्या पंकज धीर यांच्याकडून प्रेरणा घेतली. शिवाय ग्रँडहोमची हेअरस्टाईल 90च्या दशकातील संजय दत्तच्या केशरचनेसारखी आहे. त्याच्या हेअरस्टाईलने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. ग्रँडहोमची हेअरस्टाईल 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या महाराभरात शो मधील कर्णची भूमिका बजावलेल्या धीर यांच्यासारखी आहे.
कॉलिन डी ग्रँडहॉम हेअरस्टाईल
Colin De Grandhomme Hairstyle 😂🔥 pic.twitter.com/8lCn3uuVIu
— ℳя. வில்லங்கம் (@Vineethian) June 19, 2021
ग्रँडहोमने महाभारतात काम केले
Colin de Grandhomme worked in Mahabharat before joining cricket pic.twitter.com/XnMpfiTMaD
— Ranjit Singh Bhagat (@ranjitsbhagat) June 19, 2021
महाभारत काळापासून प्रवास
Colin de Grandhomme has time travelled from Mahabharat era to playing #ICCWorldTestChampionship final . #INDvsNZ pic.twitter.com/Fyua80fArT
— Punwala (@ABkanand) June 19, 2021
संजय दत्त...गोलंदाजी
#SanjayDutt comes into the attack now 😂#WTCFinal2021 #WTCFinal #NZvIND #TrendingNow #ColinDeGrandHomme #Mullet @duttsanjay #RanbirKapoor pic.twitter.com/akf5YntVlV
— Saurhav Jaiin (@meetsaurhav) June 19, 2021
ग्रँडहोमच्या हेअर स्टाईलची प्रेरणा
Colin de Grandhomme hair style inspiration * #WTCFinal #INDvNZ pic.twitter.com/CcIwdKugIx pic.twitter.com/ekNVjzc2mv
— लिबरल चचा 🇮🇳⚪ (@Liberal_chacha) June 19, 2021
लक्षात घेण्यासारखे म्हणजे झिम्बाब्वे येथे जन्मलेला ग्रँडहॉम न्यूझीलंडकडून तीनही स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो. 34 वर्षीय याने 26 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 36 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने आयपीएलचे 25 सामने देखील खेळले आहेत. ग्रँडहोमने भारताविरुद्ध पहिल्या डावात हा लेख लिहीपर्यंत 6 ओव्हर गोलंदाजी करत 15 धावा दिल्या आहेत.