चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने (England) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 191 धावांनी पराभूत करून मालिका 3-1 ने जिंकली. या विजयासह इंग्लंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) गुणतालिकेत आपले स्थान आणखी मजबूत केले आणि तिसर्या स्थानावर आहे. पहिल्या डावात पाच विकेट घेतल्यावर मार्क वुडने दुसर्या डावात चार विकेट्स घेतल्या. सामन्यात त्याने एकूण नऊ गडी बाद केले. इंग्लंडने दक्षिण विरूद्ध विजयासाठी 466 धावांचे अशक्य लक्ष्य ठेवले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात यजमान आफ्रिका संघ 77.1 ओव्हरमध्ये 274 धावांवर ऑलआऊट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्या डावात रस्सी व्हॅन डर ड्यूसेनने 138 चेंडूत 15 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 98 धावांची शानदार खेळी साकारली परंतु तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. कर्णधार फाफ डु प्लेसिसने 35, यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक 39, टेम्बा बावुमा 27, पीटर मालन 22 आणि डीन एल्गर 24 याने धावा केल्या. (ICC Test Rankings: विराट कोहली चे अव्वल स्थान अजूनही कायम, दुहेरी शतक झळकावणाऱ्या एंजेलो मॅथ्यूज ला झाला फायदा)
या विजयसह जो रूटच्या नेतृत्वाखालील संघाच्या नावावर 146 गुण आहेत. या मालिकेत इंग्लंडला दोन सामने जिंकल्यावर 60 गुण मिळाले. मात्र, दुर्दैवाने दक्षिण आफ्रिकेने चौथ्या कसोटी सामन्यातील ओव्हर-रेटमुळे सहा गुणांची कपात केली आणि आता प्रोटीसकडे अवघे 24 गुण शिल्लक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया अद्याप अनुक्रमे अव्वल दोन स्थानांवर आहेत, तर वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशने अद्याप आपले खाते उघडलेले नाही आणि खालच्या दोन स्थानांवर कब्जा केला आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-2021 पॉइंट्स टेबल
संघ | सामने | विन | लॉस | टाय | ड्रॉ | नेट रन-रेट | पॉइंट्स |
भारत | 7 | 7 | 0 | 0 | 0 | 0 | 360 |
ऑस्ट्रेलिया | 10 | 7 | 2 | 0 | 1 | 0 | 296 |
इंग्लंड | 9 | 5 | 3 | 0 | 1 | 0 | 146 |
पाकिस्तान | 4 | 1 | 2 | 0 | 1 | 0 | 80 |
श्रीलंका | 4 | 1 | 2 | 0 | 1 | 0 | 80 |
न्यूझीलंड | 5 | 1 | 4 | 0 | 0 | 0 | 60 |
दक्षिण आफ्रिका | 7 | 1 | 6 | 0 | 0 | 0 | 24 |
वेस्ट इंडिज | 2 | 0 | 2 | 0 | 0 | 0 | 0 |
बांग्लादेश | 2 | 0 | 2 | 0 | 0 | 0 | 0 |
पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील अॅशेस, 1 ऑगस्टपासून सुरु झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही उद्घाटन आवृत्ती आहे. या स्पर्धेत आयर्लंड आणि अफगाणिस्तान स्पर्धेतून वगळलत एकूण 9 देशांचा या चॅम्पियनशिपमध्ये समावेश करण्यात आला आहे. येत्या दोन वर्षांत खेळल्या जाणार्या 27 मालिकांमधील नऊ संघ एकत्रित 71 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतील. आणखी एक सदस्य झिम्बाब्वेला भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निलंबित करण्यात आले आहे.