भारत (India) विरुद्ध अफगाणिस्तान (Afghanistan) मॅचमध्ये भारतीय फलंदाज 224 धावा इतकीच मजल मारू शकले. अफगाणच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना मोठं शॉट्स खेळण्याची साधंच दिली नाही. कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव ने अर्ध-शतकी खेळी केली. के एल राहुल 30 धावा करून परतला. विजय शंकर (Vijay Shankar) आणि माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) यांनी अनुक्रमने 29 आणि 28 धावांची खेळी केली. (ICC World Cup 2019: IND vs AFG मॅचमध्ये रोहित शर्मा ने आउट होताच रचला हा कीर्तिमान)
विजय बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या धोनीने संथ खेळी केली मात्र रशीद खान (Rashid Khan) ची गुगली पुढे जाऊन खेळण्याच्या नादात यष्टीबाद झाला. धोनी हा जगातील सर्वोत्तम यष्टिरक म्हणून त्याची ख्याती आहे. पण त्याचा डाव त्याच्यावरच उलटवून रशीद ने त्याला आपली जाळ्यात अडकवले.
धोनी ने भारताचा घसरत असलेला डाव सावरायचा प्रयत्न केला मात्र त्याच्या संथ खेळीची सर्वत्र टीका केली जात आहे.