ICC World Cup 2019: IND vs AFG मॅचमध्ये रोहित शर्मा ने आउट होताच रचला हा कीर्तिमान
(Image Credit: AP/PTI Photo)

भारत (India) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी वरचढ सुरवात केली आहे. भारतीय फलंदाजांच्या नाकी-नऊ आणत, त्यांना 224 धावनावर रोखले आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोठे शॉट्स खेळाची संधीच दिली नाही. अफगाण गोलंदाजांचा पहिला बळी ठरला तो म्हणजे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma). आणि आपल्या विकेटच्या रूपात रोहित ने एक कीर्तिमान आपल्या नवे केला आहे. (IND vs AFG, ICC World Cup 2019: अफगाण फिरकी समोर भारत निरुत्तर, भारताने केल्या 224 धावा)

यंदाच्या विश्वकपमध्ये एकाही फिरकी गोलंदाजाने भारतीय फलंदाजाला बाद केलं नव्हतं. मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman) ने रोहितला बाद केल्याने 2019 विश्वकपमधील फिरकी गोलंदाजाने बाद केलेला रोहित पहिला बळी ठरला. रोहित केवळ एक धाव केल्यावर बाद झाला.

आतापर्यंत भारताने विश्वकपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे. तर, अफगाणिस्ताननं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नसल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.