(Photo Credits: Getty Images)

आयसीसी (ICC) विश्वचषकमध्ये आज बर्मिंगहॅम (Birmingham) च्या एजबस्टन (Edgbaston) येथे भारत (India)-इंग्लंड (England) मध्ये सामना खेळाला जात आहे. यंदाच्या विश्वकपमध्ये जलद गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने आपली निवड सार्थक केली आहे. विश्वकपमधील आपल्या पहिल्या सामन्यात शमी ने चाहत्यांना आपल्या खेळी ने खुश केले आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध हॅट-ट्रिक घेत शमी ने टीम चा विजय निश्चित केला. तर वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध शमी ने विजयी सलामी दिली आणि टीमच्या विजयात मोलाचं योगदान दिले. आज एजबास्टन येथील इंग्लंड विरुद्ध सामन्यात देखील शमी ने संतोष जनक कामगिरी केली आहेत. (IND vs ENG, CWC 2019: सर जडेजाची कमाल! जेसन रॉय चा सुपरडुपर कॅच घेत भारताला मिळवून दिले पहिले यश, Netizens कडून कौतुकाचा वर्षाव)

इंग्लंड विरुद्ध सामन्यात शमी ने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. शमीने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), जो रूट (Joe Root), इऑन मॉर्गन (Eoin Morgan), जोस बटलर (Jos Buttler) आणि ख्रिस वोक्स (Chris Woakes) ला बाद केले. शमीनं वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. शिवाय शमी हा माजी भारतीय क्रिकेटपटू नरेंद्र हिरवानी नंतर दुसरा भारतीय आहे ज्याने लागोपाठ सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहे. हिरवानी यांनी 1988 मध्ये भारतासाठी लागोपाठ 3 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच शमीच्या आधी, पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी ने विश्वकप मध्ये सलग सामन्यात 4-विकेट घेण्याचा पराक्रम केला  होता. याच बरोबर, शमीने विश्वकपमध्ये 3 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड ने भारताला जिंकण्यासाठी 338 धावांचे आव्हान दिले. यजमानांनासाठी बेअरस्टो सर्वाधिक 111 धावा केल्या तर बेन स्टोक्सच्या 79 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 337 धावांपर्यंत मजल मारली. स्टोक्स ने रूटच्या संतही ने चौथ्या विकेटसाठी चांगली फलंदाजी करत इंग्लंडचा घसरत डाव सावरला. आजचा हा सामना भारत आणि इंग्लंड होनी संघासाठी महत्वाचा आहे.