ICC Women’s T20 World Cup 2020: भारतीय महिला क्रिकेट संघाचा फायनलमध्ये प्रवेश; विराट कोहली, के.एल राहुल, शिखर धवन यांच्यासह 'या' माजी खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव

महिला टी-20 विश्वचषक 2020 (ICC Women's T20 World Cup 2020) मध्ये भारतीय महिला संघाने (India Women National Cricket Team) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), के.एल राहुल (KL Rahul), शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्यासह माजी खेळाडू व्ही. व्ही. एस लक्ष्मण (VVS Laxman) वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यांनी भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सिडनी मैदानात सेमीफाइनल लढत होणार होती. पंरतु, पावसामुळे सामना रद्द झाल्याने भारतीय महिला संघाला विजयी घोषीत करण्यात आले आहे. आसीसीच्या नियमानुसार, सेमीफायनचा सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळतो. महिला टी-20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने उत्तम कामगिरी करून साखळी सामन्यातील सर्व सामने जिंकले आहेत. याचाच फायदा भारतीय संघाला मिळाला आहे. भारतीय संघाने फायनलमध्ये जागा निश्चित केली असून भारतीय संघापुढे कोणत्या संघाचे आव्हान असणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महिला टी-20 विश्वचषक 2020 मध्ये भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. यामुळे भारतीय संघाने फायनलमध्ये जाणारा पहिल्या संघाचा मान पटकावला. इंग्लंडला साखळी फेरीत एका सामन्यात पराभवाचा स्वीकारावा लागला होता. पण इतर सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य आहे. परंतु, इंग्लंडने विश्वचषक 2009, 2012, 2014, 2016 आणि 2018 दरम्यान भारताला पराभूत केले होते. हे देखील वाचा- Women's T20 World Cup 2020: पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात थायलंड महिला टीमने केलेला डांस पाहून तुम्हालाही वाटेल थिरकावेसे (Video)

विराट कोहली याचे ट्वीट-

शिखर धवन याचे ट्वीट-

के.एल.राहुल याचे ट्वीट-

व्ही.व्ही लक्ष्मण यांचे ट्वीट-

वीरेंद्र सेहवाग यांचे ट्वीट-

महत्वाचे म्हणजे, याच मैदानावर दुपारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास आसीसीच्या नियमाच्या आधारे आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. जर सामना झाला तर विजेता संघ 8 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारताविरुद्ध विजेतेपदासाठी लढत देईल.