थायलंड महिला टीम (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

थायलंड महिला संघाने (Thailand Women's Team) आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) अंतिम 10 टीममध्ये स्थान मिळवले. त्यांना या स्पर्धेत अद्याप एकही विजय मिळवता आला नसला तरी त्यांनी चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले. पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध स्पर्धेतील अंतिम सामना खेळणाऱ्या थायलंड टीमने टॉस गमावून पहिले फलंदाजी केली आणि 3 बाद 150 धावा केल्या. थायलंडने या स्पर्धेत आजवरचे काही उत्कृष्ट क्षण प्रदान केले आहेत. दोन्ही संघ स्पर्धेचे विजयासह संपवण्याच्या प्रयत्नात होते, मात्र पावसाने त्यांच्या हेतूवर पाणी फेरले. थायलंडने पहिल्या डावात फलंदाजी केल्यावर सामना पावसामुळे थांबवण्यात आला. असे असूनही थायलंड संघाचा उत्साह कमी झाला नाही आणि एका उस्फुर्त पद्धतीने चाहत्यांचे मनोरंजन केले. पावसाने सामन्यात विलंब आणल्यानंतर थायलंड महिलांनी मैदानातच डांस केला आणि चाहत्यांचे मनोरंजन केले. (Women's T20 World Cup 2020: वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवानंतर थाईलँड महिला टीमने अशाप्रकारे मानले चाहत्यांचे आभार, जिंकली मनं VIDEO)

आयसीसीने याचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले,"पावसाने विलंब आणल्यानंतर थायलंडने उत्स्फूर्त नृत्य करूनचाहत्यांचे मनोरंजन केले. #TheBigDance चा भाग बनल्याबद्दल धन्यवाद!" यंदाच्या स्पर्धेकच्या प्रत्येक सामन्यात थायलंड महिला संघाच्या उत्साहाने सर्वांना प्रभावित केले. स्पर्धेत एकही सामना न जिंकलेल्या थायलंडने चेहऱ्यावरील हसू कमी होऊ दिले नाही. त्यांचा हा डांस पाहून तुम्ही स्वतःला थिरकण्यापासून थांबवू शकणार नाही.

दरम्यान, आजच्या या सामन्यात थायलंडने टी-20 मधील त्यांच्या सर्वाधिक धावांची नोंद केली. थायलंडने केलेल्या 150 धावा सिडनी शो ग्राउंडमध्ये सर्वाधिक टी-20 धावा आहेत. थायलंड आणि पाकिस्तान यापूर्वीच महिला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे.