न्यूझीलंड दौऱ्यावर (New Zealand Tour) पुढील महिन्यात होणारी मर्यादित षटकांची मालिका आणि मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप (ICC Women's World Cup) स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 सदस्यीय भारतीय संघाची (Indian Team) घोषणा केली. दिग्गज फलंदाज मिताली राजच्या हाती संघाची कमान देण्यात आली असून युवा सलामीवीर जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे (Shikha Pandey) यांनी वगळण्यात आले आहे. जेमिमाह आणि शिखाला वर्ल्ड कप संघातून डच्चू दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी आणि शफाली वर्मा हे संघातील इतर अपेक्षित चेहरे आहेत. मात्र रॉड्रिग्स आणि पांडेला वगळण्याने क्रिकेट विश्वाला या निर्णयामागील तर्क समजला नाही. या दोघींना कोणत्या आधारावर वगळण्यात आले आहे या स्पष्टतेच्या अभावामुळे चाहते आणि तज्ञांमध्ये भरपूर विवाद सुरू झाले आहेत. दरम्यान, बीसीसीआयच्या महिला मुख्य निवडक नीतू डेविड (Neetu David) यांनी संघ निवडीबाबत बोलणे टाळले. (ICC महिला विश्वचषक 2022 आणि न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; जेमिमाह रॉड्रिग्सला डच्चू, मिताली राजच्या हाती संघाची कमान)
बीसीसीआय महिला संघाच्या मुख्य निवडकर्ता नीतू डेविड यांनी गुरुवारी सांगितले की 2022 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवडीबाबत पाच सदस्यीय निवड समितीला बोलण्याची परवानगी नाही. संघ निवडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. “सध्या आम्हाला बोलण्याची परवानगी नाही,” डेविडने UNI ला वादग्रस्त निवडीबद्दल विचारल्यानंतर सांगितले. लक्षात घ्यायचे की जेव्हा जेव्हा अशा स्पर्धेसाठी संघाची घोषणा होते तेव्हा BCCI पत्रकार परिषद आयोजित करते. महिला टी-20 विश्वचषक 2020 संघाच्या घोषणेदरम्यानही पत्रकार संघाचे आयोजन करण्यात आले होते. निवडकर्ते संघाच्या निवडीबद्दल मीडियाला संबोधित करतील की नाही याबद्दल विचारले असता, डेविड म्हणाल्या, “आत्ता मला कल्पना नाही.”
🚨 NEWS 🚨: India Women’s squad for ICC Women’s World Cup 2022 and New Zealand series announced. #TeamIndia #CWC22 #NZvIND
More Details 🔽https://t.co/qdI6A8NBSH pic.twitter.com/rOZ8X7yRbV
— BCCI Women (@BCCIWomen) January 6, 2022
दरम्यान विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ किवी संघाविरुद्ध 5 वनडे आणि एक टी-20 सामना खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला वर्ल्ड कप सामना 4 मार्च रोजी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळवला जाईल आणि 3 एप्रिल रोजी क्राइस्टचर्च येथील हॅगले ओव्हल येथे अंतिम सामन्याचा थरार रंगेल. तर मिताली राजच्या नेतृत्वात टीम इंडिया 6 मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेत मोहिमेला सुरुवात करणार आहे.