मिताली राज (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 साठी भारतीय संघाच्या (Indian Team) 15 सदस्यीय संघाची निवड केली. अनुभवी भारतीय क्रिकेटपटू मिताली राजच्या (Mithali Raj) हाती संघाची कमान देण्यात आली आहे तर अष्टपैलू हरमनप्रीत कौर उपकर्णधार असेल. तसेच जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि शिखा पांडे या दोन खेळाडू आहेत ज्यांना 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान न्यूझीलंडमध्ये (New Zealand) होणाऱ्या शोपीस इव्हेंटसाठी वगळण्यात आले आहे. 2021 मध्ये रॉड्रिग्ज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरली आणि पांडेही प्रभावी दिसली नाही. भारताच्या स्टार क्रिकेटपटू मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांचा हा अखेरचा एकदिवसीय विश्वचषक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे संघ यंदा या दोन्ही दिग्गज खेळाडूंना विजयी निरोप देण्यासाठी प्रयत्नशील असेल.

जेमिमाह रॉड्रिग्स भारताच्या ऑस्ट्रेलियात शेवटच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपर्यंत संघाचा अविभाज्य भाग होती. शिखा पांडेला देखील भारतीय संघातून वगळण्यात आले आहे, तर स्नेह राणा, जिने 2021 मध्ये तिच्या अष्टपैलू कौशल्याने प्रभावित केले होते, तिने संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या वेळापत्रकबाबत बोलायचे तर टीम इंडिया (Team India) 6 मार्च 2022 रोजी बे ओव्हल, तौरंगा येथे पाकिस्तान विरुद्ध त्यांचा पहिला विश्वचषक सामना खेळेल. महिला विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सामन्यानंतर, गट टप्प्यात भारतीय संघ न्यूझीलंड (10 मार्च), वेस्ट इंडिज (12 मार्च), इंग्लंड (16 मार्च), ऑस्ट्रेलिया (19 मार्च), बांगलादेश (22 मार्च) आणि दक्षिण आफ्रिका (27 मार्च) यांच्याविरुद्ध सामना खेळणार आहे.

2022 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ:

न्यूझीलंड विरुद्ध 5 एकदिवसीय सामने आणि ICC महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडिया: मिताली राज (कॅप्टन), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.

स्टँडबाय खेळाडू: सभिनेनी मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादूर.

याशिवाय BCCI ने 9 फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणार्‍या न्यूझीलंड विरुद्धच्या एकमेव आंतरराष्ट्रीय टी-20 साठी देखील 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया 11 फेब्रुवारी पासून न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे.

एकमेव टी-20 सामन्यासाठी भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एकता बिश्त, एस. मेघना, सिमरन दिल बहादूर.