ICC Latest Test Rankings: भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील अॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने लेटेस्ट रँकिंग (ICC Rankings) जाहीर केली आहे. पहिल्या पिंक-बॉल कसोटीच्या पहिल्या डावात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 74 धावांची खेळी केली ज्याचा फायदा त्याला कसोटी क्रमवारीत झाला आहे. क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या विराटच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे आणि स्टिव्ह स्मिथच्या (Steve Smith) पहिल्या स्थानमधील अंतर कमी केलं आहे. भारताविरुद्ध पहिल्या कसोटी स्मिथ खास प्रभावी कामगिरी करू शकला नाही ज्याचं नुकसान त्याला झालं मात्र 901 गुणांसह त्याने आपले पहिले स्थान कायम ठेवले तर विराट 888 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या डावात 43 आणि दुसऱ्या डावात शून्यावर माघारी परतलेला भारताचा चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) 8व्या स्थानी घसरण झाली आहे. विराट आणि पुजाराला वगळता पहिल्या 10 खेळाडूंमध्ये एकही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही आहे. (Virat Kohli Year in 2020 Stats: विराट कोहली याच्यासाठी 2020 ठरले अनलकी, ‘रन-मशीन’च्या शतकांवरही लागले ‘लॉकडाऊन’)
ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने 592 गुणांसह 33 व्या स्थानावर झेप घेतली. पेनने नाबाद 73 धावांची झुंझार खेळी केली आणि पहिल्या कसोटीत सामनावीर पुरस्कार मिळविला. मार्नस लाबूशेनला आपल्या 47 आणि 6 डावांच्या खेळीमुळे त्याला कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 839 गुणांवर समाधान मानावे लागले. जो बर्न्सला दुसऱ्या डावातील त्याच्या नाबाद 51 धावांचा फायदा झाला आणि त्याने 48वे स्थान मिळवले. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन विराट कोहलीपासून फार दूर नाही. विल्यमसन कोहलीच्या गुणांच्या फक्त 11 गुणांनि पिछाडीवर आणि पितृत्वाच्या रजेमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये तो सहभागी होणार नसल्याने किवी कर्णधाराकडे यंदाचे वर्ष कोहलीच्या पुढे संपवण्याची संधी आहे.
Virat Kohli gains two points to reduce the gap between him and Steve Smith in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting 🎉
Full list 👉 https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/LbUovKuEf6
— ICC (@ICC) December 20, 2020
दुसरीकडे, गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने (Josh Hazlewood) भारताच्या दुसर्या डावात 8 धावांवर 5 विकेट घेतल्या ज्यामुळे त्याला चार स्थानाचा फायदा झाला असून मार्च 2018 नंतर प्रथमच 805 गुणांसह पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात चार घेणाऱ्या रविचंद्रन अश्विनने (R AShwin) जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मागे टाकत क्रमवारीत नववे स्थान मिळवले. बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 2 विकेट घेतल्या मात्र दुसऱ्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नाही. बुमराहने 753 गुणांसह जेसन होल्डरसह संयुक्तपणे 10वे स्थान मिळवले असून त्याच्यावर पहिल्या 10 गोलंदाजांच्या यादीततून बाहेर पाडण्याचे संकट ओढवले आहे.