भारतीय संघातील (Indian Team) वेगवान गोलंदाज (Bowler) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने त्याच्या टेस्ट डेब्युमधील 606 दिवस उत्तम खेळी करत पहिल्यांदाच टेस्ट रँकिंगमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे जगातील गोलंदाज खेळाडूंपैकी त्याचे नाव दिग्गज खेळाडूंच्या लिस्टमध्ये आता झळकले आहे.
बुमराह आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहचला असून त्याची करिअरमधील आता पर्यंतची खेळी पाहता 835 पॉइंट्स मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंस हा दिग्गज गोलंदाजांमधील अव्वल स्थानावर पोहचला असून त्याने 908 पॉइंट्स मिळवले आहेत. कमिंस हा एकमेव गोलंदाज आहे की त्याचे 900 पेक्षा अधिक पॉइंट्स आहेत. तर दक्षिण अफ्रिकेमधील कॅगिसो रबाडा 851 पॉइंट्स मिळवत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
जानेवारी 2018 मध्ये बुमराह याने साउथ आफ्रिका विरोधात उत्तम खेळी करत टेस्ट डेब्यु केला होता. तर अवघ्या 606 दिवसांच्या टेस्ट मॅचमधील बुमराह याची गोलंदाजी पाहता त्याने यशाची पायरी चढत तिसरे स्थान पटकवले आहे. बुमराह आता 25 वर्षांचा असून त्याच्या शानदार खेळीने त्याला महान गोलंदाजाच्या लिस्टमध्ये पोहचवले आहे.(जसप्रीत बुमराह याने हॅट्रिक घेवून रचला इतिहास; विराट कोहली याचे मानले आभार)
ICC Tweet:
Jasprit Bumrah has jumped 4️⃣ places to claim the No.3 spot in the @MRFWorldwide ICC Test bowling rankings 👏 pic.twitter.com/x0KZXZriEE
— ICC (@ICC) September 3, 2019
बुमराह याने आता पर्यंत 12 टेस्ट मॅच खेळला आहे. दरम्यान आता पर्यंत टेस्ट मॅचमध्ये त्याने 62 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वेस्टइंडिज संघाच्या विरोधात सामन्यावेळी हॅट्रिक करत त्याने पाच वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह याने पाच विकेट्स दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज या सारख्या संघांमधील खेळाडूंच्या घेतल्या आहेत.