IND vs SL ODI: आयसीसीने (ICC) नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) खूप फायदा झाला आहे. विराट कोहली नवीन वनडे फलंदाजांची क्रमवारी (ICC ODI Ranking) जाहीर होण्यापूर्वी 8 व्या क्रमांकावर होता. मात्र बांगलादेश आणि श्रीलंका (IND vs SL) विरुद्धच्या वनडे मालिकेत शतके झळकावल्यानंतर कोहली आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, सध्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. ज्याचा पहिला सामना मंगळवारी झाला. या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी करत 67 धावांनी विजय मिळवला. दुसरीकडे, या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा स्टार फलंदाज विराट कोहली होता. या सामन्यात कोहलीने श्रीलंकेविरुद्ध शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. ज्याचा थेट फायदा त्याला वनडे क्रमवारीत झाला आहे.
एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजला झाला फायदा
विशेष म्हणजे, सध्या भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज शानदार फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात घातक गोलंदाजी करताना या गोलंदाजाने 2 फलंदाजांना आपला बळी बनवले. त्याचबरोबर या उत्कृष्ट कामगिरीनंतर सिराजला थेट एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजांच्या क्रमवारीत फायदा झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वनडेमधील नवीन गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत तो चार स्थानांनी पुढे सरकत 18व्या स्थानावर पोहोचला आहे. (हे देखील वाचा: Anushka Sharma-Virat Kohli ची मुलगी Vamika झाली 2 वर्षांची, अभिनेत्रीने सुंदर Photo केला शेअर)
? Australia's star performers make big gains ⬆️
? Indian players rewarded ?
Some big movements in the @MRFWorldwide ICC Men's Player Rankings this week ?https://t.co/N1jZSShD8a
— ICC (@ICC) January 11, 2023
सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम
जर आपण T20 फलंदाजांच्या नवीन आयसीसी क्रमवारीबद्दल बोललो तर, भारतीय स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव येथे चमकत आहे. कारण नवीन रँकिंगमध्ये सुयारकुमार यादव 908 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा रिझवान आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने सर्वांची मने जिंकली. कारण त्याने पाहुण्या संघ श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते. ज्याचा थेट फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला आहे.