SRH (Photo Credit - X)

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad, TATA IPL 2025 65th Match: आयपीएल 2025 चा 65 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने बंगळुरुचा 42 धावांनी पराभव केला आहे. आरसीबीने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तर, हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याआधी, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलदांजी करताना हैदराबादने बंगळुरुसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 190 धावा करू शकला. चालू हंगामात बेंगळुरूचा हा चौथा पराभव आहे, तर हैदराबादचा पाचवा विजय आहे.

इशान किशनची स्फोटक खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी जलद 54 धावांची भागीदारी केली. सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 231 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनने नाबाद 94 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, इशान किशनने 48 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकार मारले. इशान किशन व्यतिरिक्त अभिषेक शर्माने 34 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रोमारियो शेफर्डने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. रोमारियो शेफर्डशिवाय लुंगी एनगिडी, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.

पॅट कमिन्सने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट्स

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची शानदार भागीदारी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ 19.5 षटकांत फक्त 189 धावा करून सर्वबाद झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फिलिप सॉल्टने 64 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, फिलिप सॉल्टने 32 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकार मारले. फिलिप सॉल्ट व्यतिरिक्त विराट कोहलीने 43 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स व्यतिरिक्त इशान मलिंगाने दोन विकेट घेतल्या.