RCB Vs DC 19th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 19 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Royal Challengers Bangalore Vs Delhi Capitals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाचे कर्णधार पद भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली संभाळत आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या तर, बंगळरूचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या अनेकांना ड्रीम 11 गेमचे वेड लागल्याचे पाहायला मिळाले आहे. आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो गुणतालिकेत अव्वल स्थान गाठणार आहे. यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर रॉयल चॅलेंजर्स बंगळरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- RCB vs DC Dream11 Team Prediction IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यातील ड्रीम 11 गेममध्ये 'हे' खेळाडू अधिक पॉईंट मिळवून देण्याची शक्यता; पाहा संपूर्ण यादी
हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-
- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.
- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.
- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अॅप चिन्ह दिसेल.
- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अॅप उघडू शकतात.
- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.