हर्षा भोगले यांनी निवडली 2019 ची टेस्ट, टी-20 आणि वनडे टीम XI; टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटपटुंना केले सामिल
हर्षा भोगले (Photo Credits: Getty Images)

भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) बर्‍याच दिवसांपासून चांगली प्रगती करीत आहे. आयसीसीने सुरू केलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेले सर्व सामने जिंकून टीम इंडिया 360 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. आता क्रिकेट तज्ज्ञ हर्षा भोगले (Harsha Bhogle) ने क्रिकबझवर 2019 चा जगातील सर्वोत्कृष्ट वनडे, टेस्ट आणि टी-20 प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. भोगले यांनी या संघात अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. भोगले यांनी 2019 मधील सर्वोत्कृष्ट अकरा टेस्ट खेळाडू शेअर केले, ज्यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भोगलेंच्या टेस्ट इलेव्हनमध्ये मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या जोडीला डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी दिली आहे. शिवाय, गोलंदाजीत फक्त मोहम्मद शमी (Mohammed Shami) याचा समावेश केला आहे. भोगलेंच्या टेस्ट इलेव्हनमध्ये चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सामिल करण्यात आले आहे. (गौतम गंभीर याने World XI संघातून एमएस धोनी याला वगळले, विराट कोहली नाही, तर 'या' क्रिकेटपटूची कर्णधार म्हणून केली निवड)

दुसरीकडे, वनडे इलेव्हनमध्ये चार भारतीय आहेत. रोहित इंग्लंडच्या जेसन रॉय (Jason Roy) सह सलामीची सुरुवात करेल. पाकिस्तान टी-20 संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) ज्याचा 2019 हे ब्रेकआउट वर्ष होते, तो चौथ्या क्रमांकावर आहे. बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याला पाचव्या आणि सहावे स्थान देण्यात आले आहे. वनडे संघाबरोबरच भोगलेंनी वर्षाची टी-20 इलेव्हनदेखील निवडली. यावर्षी बर्‍याच नवीन चेहर्‍यांनी चांगली कामगिरी केली. डावाची सुरुवात करण्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि भारताच्या केएल राहुल (KL Rahul) ची निवड केली. राहुल त्याच्या संघाचा यष्टीरक्षकही आहे. मधल्या फळीसाठी त्याने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स - सर्वोत्तम जोडी निवडली. पाचव्या क्रमांकासाठी, भोगले यांनी वेस्ट इंडीजचा अष्टपैलू किरोन पोलार्डची निवड केली आहे. सहाव्या आणि 7 व्या स्थानासाठी त्याने विंडीजचा आंद्रे रसेल आणि अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरसह भोसलेच्या वर्षाच्या टी -20 इलेव्हनमध्ये राशिद खानची फिरकीपटू म्हणून निवड केली गेली आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा क्रिस जॉर्डन, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि भारतीय गोलंदाज दीपक चहर यांचा समावेश आहे.

हर्षा भोगलेची 2019 ची टेस्ट इलेव्हनः

मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, टॉम लॅथम, मार्नस लाबूशेन, बेन स्टोक्स, बीजे वॅटलिंग, नाथन लायन, मिशेल स्टार्क, नील वॅग्नर, पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमी.

हर्षा भोगलेची 2019 चा टी-20 इलेव्हनः

डेविड वॉर्नर, केएल राहुल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, किरोन पोलार्ड, आंद्रे रसेल, मोहम्मद नबी, क्रिस जॉर्डन, दीपक चाहर, लसिथ मलिंगा, आणि इमरान ताहीर.

हर्षा भोगलेचे 2019 चा वनडे इलेव्हनः  

रोहित शर्मा,जेसन रॉय, विराट कोहली, बाबर आझम, बेन स्टोक्स, जोस बटलर, मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव.