IND vs AUS T20I 2020: वेल डन पांड्या! हार्दिकने टी-नटराजनला दिली आपली ‘Man of the Series’ ची ट्रॉफी, जाणून घ्या कारण
हार्दिक पांड्या आणि टी नटराजन (Photo Credit: Instagram/hardikpandya93)

IND vs AUS T20I 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) टी-20 मालिकेत जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केलेल्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) तिसऱ्या टी-20 मालिकेनंतर मॅन ऑफ द सीरिज म्हणून निवडण्यात आले. या दरम्यान हार्दिकने भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजनला (T Natarajan) प्रमुख व्हाईट बॉल गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीत शानदार गोलंदाजी करण्याबद्दल श्रेय दिले व वेगवान गोलंदाजाला आपली पुरस्काराची ट्रॉफी त्याला दिली. युवा प्रतिभावान खेळाडूला ही मिळायला हवी असे कारण हार्दिकने सांगितले. दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) उत्कृष्ट कामगिरीबद्दल तामिळनाडूच्या वेगवान गोलंदाजाचे कौतुक केले आणि त्याला प्रेरित करण्यासाठी मालिका ट्रॉफी दिली. विशेष म्हणजे, प्रेझेंटेशन सोहळा संपल्यानंतर टीम इंडियाच्या (Team India) फोटो सेशन दरम्यान नटराजन दोन्ही ट्रॉफीसह पोज देताना दिसला. (IND vs AUS: तिसऱ्या टी-20 दरम्यान विराट कोहलीचा Lookalike सिडनीच्या मोठ्या पडद्यावर झळकला, पाहून भारतीय कर्णधाराने दिली अशी प्रतिक्रिया Watch Video)

सिडनी क्रिकेट मैदानावर तिसर्‍या व अंतिम टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 12 धावांनी विजय मिळवत भारताचा सलग 10 सामने जिंकण्याचा विजयी रथ रोखला. मात्र, टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकल्याने 2-1 ने मालिकेत विजय मिळवला. अंतिम टी-20 नंतर हार्दिक पांड्याने आपला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार नटराजनला देत आपण फक्त एक फलंदाज म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणूनही परिपक्व झालो आहोत हे दाखवून दिले. विशेष म्हणजे पांड्याने नटराजनचे कौतुक करण्यासाठी इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबत एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली. “नटराजन, तू या मालिकेत अप्रतिम होतास. आपल्या भारतासाठी पदार्पणात कठीण परिस्थितीत चमकदार कामगिरी करणे तुझ्या प्रतिभेचे आणि परिश्रमांचे प्रमाण देते. माझ्यासाठी तू सामनावीरसाठी पात्र आहेस! विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93)

तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या टी-20 सामन्यात पदार्पण करणाऱ्या नटराजनने तिन्ही सामन्यांमध्ये अपवादात्मक कामगिरी बजावली. टी-20 पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या ज्यामुळे भारताने 161 धावांचा सहज बचाव केला. पण, दुसर्‍या टी-20 सामन्यात जेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होते त्याने त्याच्या चार ओव्हरमध्ये केवळ 20 धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले. तिसर्‍या सामन्यात वेगवान गोलंदाजाला 33 धावा देत 1 विकेट मिळाली.