सचिन तेंडुलकर, विराट कोहली (Photo Credit: Getty)

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (International Nurses Day) 12 मे रोजी भारतासह जगभरात साजरा केला जात आहे. हा दिवस फ्लोरेंस नाइटिंगेलचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. फ्लोरेन्स तिच्या सेवा भावनेसाठी परिचित होती. जगभरात कोरोना व्हायरसचा धोका कायम असतानाही हे आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचविण्यात मदत करीत आहेत. सोशल मीडियावर लोक या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय परिचारिक दिनानिमित्त प्रेरणादायी मेसेज पोस्ट केले. आंतरराष्ट्रीय परिचारिक दिनानिमित्त कोहली आणि तेंडुलकर यांनी चोवीस तास कार्यरत असलेल्या नर्ससाठी मनापासून निरोप पाठविला. कोहलीने सर्व परिचारिकांचे नि:स्वार्थ सेवा, समर्पण,आव्हानात्मक काळात करुणा व दयाळूवृत्ती आणि इतर गोष्टीबद्दल आभार मानले. (International Nurse Day 2020: मुंबई महापौर किशोरी पेडणेकर ते बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा कोरोना संकटात 'या' महिलांनी पुन्हा स्वीकारला रूग्णसेवेचा वसा!)

कोहली यांनी लिहिले, “अशा कठीण काळात तुमची निस्वार्थ सेवा, समर्पण, करुणा व दयाळूपणाबद्दल धन्यवाद. हसत डोळ्यांचा हसणारा चेहरा. चला आपण सर्वजण #InternationalNursesDay साजरा करण्यासाठी एकत्र येऊ या." दुसरीकडे, मास्टर-ब्लास्टर सचिनने जगभरातील परिचारिकांचे 'मूक संरक्षक' म्हणून कौतुक केले. "आज जगभरातील सर्व परिचारिकांचा साजरा करण्याचा आणि त्यांचे आभार मानण्याचा एक दिवस आहे जे अस्वस्थ आणि गरजूंना काळजी व लक्ष देत आहेत. ते मूकसंरक्षकआहेत जे स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी अमूल्य योगदान देतात," सचिनने ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे.

विराट

सचिन

या दोघांऐवजी अष्टपैलू रवींद्र जडेजानेही परिचारिकांना सलाम केला. जडेजा म्हणाला,"आमच्या परिचारिकांच्या समर्पणास आदर आणि सलाम. या साथीच्या आजाराशी लढण्यासाठी आपले योगदान अफाट आहे. #आंतरराष्ट्रीयनर्सेडे च्याहार्दिक शुभेच्छा!

आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्म वर्धापन दिन असल्याने जानेवारी 1974 मध्ये 12 मे हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आले. यंदा आंतरराष्ट्रीय नर्स डे 2020 ची थीम "नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ" आहे.