MI vs GT (Photo Credit - Twitter)

GT vs MI: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये (IPL 2023), क्वालिफायर 2 शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs GT) यांच्यात खेळला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) हा सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा असेल. यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. पराभूत संघाचा प्रवास तिथेच संपेल. मुंबई इंडियन्स लीगच्या टप्प्यानंतर गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिले. संघाचे 14 सामन्यांत 8 विजय आणि 6 पराभवांसह 16 गुण होते. यानंतर संघाने एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले आणि क्वालिफायरमध्ये स्थान निश्चित केले. स्पर्धेतील खराब सुरुवातीनंतर संघाने दमदार पुनरागमन केले आहे.

कोण कोणावर भारी?

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 3 सामने झाले आहेत. यापैकी मुंबई इंडियन्सने 2 सामने जिंकले आहेत तर गुजरात टायटन्सच्या खात्यात 1 विजय आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये प्रथमच आमनेसामने येणार आहेत. (हे देखील वाचा: GT vs MI IPL 2023 Qualifier 2: मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटनच्या सामन्यापुर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी)

कशी आहे अहमदाबादची खेळपट्टी?

अहमदाबादची खेळपट्टी उच्च स्कोअरिंग आहे, येथे नाणेफेक जिंकून संघ प्रथम गोलंदाजी करू इच्छितात. स्पिनर्सपेक्षा वेगवान गोलंदाजांना येथे जास्त विकेट मिळतात. यावर्षी या मैदानावर 200 चा टप्पा अनेक वेळा ओलांडला आहे, अशा स्थितीत प्लेऑफमध्येही धावांचा पाऊस पडू शकतो.

दोन्ही संघांची अशी असु शकते प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, कुमार कार्तिकेय आणि आकाश मधवाल.

गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, यश दयाल आणि नूर अहमद.