भारत विरुध्द पाकिस्तान (India Vs Pakistan) हा क्रिकेट सामना प्रत्येक भारतीयांसाठी फायनलपेक्षाही (Final) महत्वाचा असतो असं भारतीयांचं (India) मत आहे. सध्या एशिया कप (Asia Cup 2022) सुरु आहे. दरम्यान दोन भारत विरुध्द पाकिस्तान असे सामने झाले. भारत विरुध्द पाकिस्तानचा (India Vs Pakistan Match) पाहिला सामना भारत जिंकला तर दुसरा सामना म्हणजे कालचा सामना पाकिस्तान (Pakistan) जिंकला. काल भारत सामना हरल्याने भारतीयांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या. कालच्या या मॅचमध्ये एक टर्निंग पॉइंट (Turning Point) ठरला तो म्हणजे अर्शदिप सिंहने (Arshdeep Singh) सोडलेला कॅच (Catch). कालचा तो कॅच जर अर्शदिपने पकडला असता तर भारत मॅच जिंकला असता असा भारतीयांचा समज आहे. तरी कालपासून सोशल मिडीयावर (Social Media) अर्शदिप सिंहला जोरदार ट्रोल (Troll) केल्या जात आहे. एवढंचं नाही तर अर्शदिपच्या विकीपिडीयावर (Wikipedia) काही धक्कादायक बदल करण्यात आले.
अर्शदिप सिंहच्या (Arshdeep Singh) विकीपीडियावरील (Wikipedia) त्याचे आणि खलिस्तान (Khalistan) संघटनेशी संबंध असल्याचे म्हटले गेले. तरी अर्शदिपसाठी खलिस्तानी हा वापरलेला शब्द अत्यंत धक्कादायक आहे. मुळात अर्शदिप (Arshdeep Singh) आणि खलिस्तानचा काहीही संबंध नाही. तरी त्याच्या विकीपीडिया (Wikipedia) पेजवर करण्यात आलेले हे बदल भारतातील वातावरण बिघडू शकते. इतक नाही तर अर्शदीप सिंगच्या कुटुंबाला देखील यामुळे धोका होऊ शकतो. (हे ही वाचा:- Virat Kohli On MS Dhoni: एम एस धोनीचा एक मेसेज का ठरला महत्वाचा, विराट कोहलीने सांगितला ‘तो’ भावनिक किस्सा; पहा व्हिडीओ)
विकिपीडीया (Wikipedia) पेजवरी (Page) अचानक बदलाच्या पार्श्वभुमिवर भारत सरकार (Government Of India) तातडीने सक्रीय झाली असून त्यांनी माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाकडून विकीपीडियाला नोटीस (Notice) पाठवली आहे. तरी विकीपीडीया या प्रकरणी काय निर्णय घेतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण विकिपीडीया याला कुणी अधिकृत एडिटर (Editor) नसुन विकिपीडीया सहज एडीट (Edit) केला जावू शकतो.