Border Gavaskar Trophy 2024-25: टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाशी संबंधित अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरे देली आहे. पहिल्या कसोटीत रोहितच्या उपलब्धतेबाबत गंभीरने म्हटले आहे की, चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. त्याने सांगितले की, रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध डावाची सुरुवात करू शकतात. गंभीरने हर्षित राणाबद्दलही बोलले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
रोहित पहिल्या कसोटीला मुकणार का?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग असेल की नाही याबाबत गौतम गंभीरने अपडेट दिले आहे. रोहितबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे गंभीरचे म्हणणे आहे. त्याने सांगितले की रोहितची उपलब्धता मालिका सुरू होण्यापूर्वीच कळेल.
Gautam Gambhir said, "Jasprit Bumrah will captain India if Rohit Sharma isn't available". pic.twitter.com/FHXioIcTa0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2024
रोहितच्या अनुपस्थितीत कोण करणार ओपनिंग?
गौतम गंभीर म्हणाला की, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल किंवा अभिमन्यू ईश्वरन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीची जबाबदारी सांभाळू शकतात. मात्र, पत्रकार परिषदेत गंभीर राहुलला अधिक पाठिंबा देताना दिसत आहे. (हे देखील वाचा: Border-Gavaskar Trophy 2024-25: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच खेळणार 'हे' 8 भारतीय खेळाडू, कामगिरीवर असणार भारतीय चाहत्यांचे लक्ष्य)
कर्णधारपदी कोण असणार?
जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकला तर भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार? या प्रश्नाला उत्तर देताना गंभीरने जसप्रीत बुमराहचे नाव घेतले. बुमराह हा उपकर्णधार असून रोहितच्या अनुपस्थितीत तो संघाची धुरा सांभाळणार असल्याचे गंभीरने सांगितले.
कोहली-रोहितच्या खराब फॉर्मवर काय म्हणाला गंभीर?
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या खराब फॉर्मबद्दल गौतम गंभीरनेही मोकळेपणाने चर्चा केली. तो म्हणाला की, दोन्ही दिग्गज फलंदाजांच्या फॉर्मबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. त्याने यापूर्वी टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली असून न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील खेळाडू चांगला खेळ दाखवण्यासाठी उत्सुक आहेत.