Year Ender 2023: शुभमन गिलपासून विराट कोहलीपर्यंत, या फलंदाजांनी गाजवले हे वर्ष, सर्वोत्कृष्ट वनडे धावा करणाऱ्यांची पाहा संपूर्ण यादी
Shubman Gill And Virat Kohli (Photo Credit - Twitter)

Year Ender 2023: हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. यावर्षी जागतिक क्रिकेटमध्ये अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. त्याचवेळी टीम इंडियाचा (Team India) युवा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (ODI International Cricket) सर्वाधिक धावा केल्या. या वर्षातील काही फलंदाजांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यादीत शुभमन गिल, विराट कोहली, (Virat kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) ते पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam) यांचा समावेश आहे. (हे देखील वाचा: Year Ender 2023: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर्षी 'या' गोलंदाजांनी केला आहे कहर, घेतल्या आहे सर्वाधिक विकेट, येथे पाहा संपूर्ण यादी)

यंदा या फलंदाजांनी केला कहर

शुभमन गिल : टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल. शुभमन गिलने 29 सामन्यात 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1584 धावा केल्या आहेत. या वर्षी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1500 हून अधिक धावा करणारा शुभमन गिल हा एकमेव फलंदाज आहे. या वर्षात शुभमन गिलने 5 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.

विराट कोहली : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 27 सामन्यात 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1377 धावा केल्या आहेत. विराट कोहली आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या वर्षात विराट कोहलीने आपल्या बॅटमधून 6 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली आहेत.

रोहित शर्मा : या यादीत तिसरे नाव आहे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे. रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या 27 सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1255 धावा केल्या आहेत. या कालावधीत रोहित शर्माने 2 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.

डॅरिल मिशेल : न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू डॅरिल मिशेल चौथ्या क्रमांकावर आहे. डेरिल मिशेलने आतापर्यंत खेळलेल्या 26 सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1204 धावा केल्या आहेत. या काळात डॅरिल मिशेलने आपल्या बॅटने 5 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत.

पथुम निसांका : या प्रकरणात श्रीलंकेचा स्फोटक फलंदाज पथुम निसांका पाचव्या क्रमांकावर आहे. पथुम निसांकाने आतापर्यंत खेळलेल्या 29 सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1151 धावा केल्या आहेत. या वर्षी पथुम निसांकाने 2 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.

बाबर आझम : पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम या यादीत सहाव्या स्थानावर आहे. यावर्षी बाबर आझमने आतापर्यंत खेळलेल्या 25 सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1065 धावा केल्या आहेत. यावर्षी बाबर आझमने 2 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत.

मोहम्मद रिझवान : या बाबतीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान सातव्या क्रमांकावर आहे. मोहम्मद रिझवानने आतापर्यंत खेळलेल्या 25 सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1023 धावा केल्या आहेत. या वर्षी मोहम्मद रिझवानने 1 शतक आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत.

डेव्हिड मलान : इंग्लंडचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मलान या यादीत आठव्या स्थानावर आहे. डेव्हिड मलानच्या नावावर आतापर्यंत 18 सामन्यात 995 धावा आहेत. या वर्षी डेव्हिड मलान 4 शतके आणि 5 अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरला आहे.

एडन मार्कराम : या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम 9व्या क्रमांकावर आहे. एडन मार्करामने आतापर्यंत 21 सामन्यांत 983 धावा केल्या आहेत. या काळात एडन मार्करामने 4 शतके आणि 5 अर्धशतकेही झळकावली आहेत.

केएल राहुल : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज केएल राहुलचे नावही या यादीत सामील आहे. या यादीत केएल राहुल दहाव्या स्थानावर आहे. केएल राहुलने आतापर्यंत 24 सामन्यात 983 धावा केल्या आहेत. या कालावधीत केएल राहुलने 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली.