Year Ender 2023: हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. वर्ष 2023 मध्ये, अनेक घातक खेळाडूंनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (ODI International Cricket) चांगली कामगिरी केली आहे. या वर्षी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे ही (ICC World Cup 2023) आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियाने (Team India) या वर्षी एकही आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकली नसली तरी टीम इंडियासाठी हे वर्ष खूप छान ठरले आहे. या गोलंदाजांनी 2023 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. (हे देखील वाचा: Year Ender 2023: टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूंनी यावर्षी केले लग्न, येथे पाहा संपूर्ण यादी)
या गोलंदाजांनी घेतल्या सर्वाधिक विकेट
कुलदीप यादव : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव या यादीत आघाडीवर आहे. कुलदीप यादवने 2023 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप यादवने 28 सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद सिराज : मोहम्मद सिराजचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये टीम इंडियाचा घातक गोलंदाज मोहम्मद सिराजने 25 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद शमी : टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीतही मोहम्मद शमीच्या नावावर नोंद आहे. मोहम्मद शमीने 19 सामन्यात 43 विकेट घेतल्या आहेत.
संदीप लामिछाने : नेपाळचा स्टार गोलंदाज संदीप लामिछाने या यादीत चौथ्या स्थानावर आहे. सन 2023 मध्ये संदीप लामिछानेने 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 43 विकेट घेतल्या आहेत.
शाहीन शाह आफ्रिदी : पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचे नावही या यादीत सामील आहे. शाहीन शाह आफ्रिदी वर्ष 2023 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. शाहीन शाह आफ्रिदीने 21 सामन्यात 42 विकेट घेतल्या आहेत.