Indian Cricketer Married In 2023: हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा टीम इंडियाने (Team India) चमकदार कामगिरी केली आहे. यावर्षी टीम इंडियाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय, (ODI International) कसोटी क्रिकेट (Test) आणि टी-20 (T20) फॉरमॅटमध्ये एकूण 11 द्विपक्षीय मालिका खेळल्या आणि यापैकी टीम इंडियाने 9 मालिका जिंकल्या. त्याच वेळी, या वर्षी एकूण 7 भारतीय क्रिकेटपटूंनी लग्न केले, ज्यामध्ये सर्वात अलीकडील लग्न वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचे (Mukesh Kumar) होते. (हे देखील वाचा: Year Ender 2023: भारतीय फलंदाजांच्या नावावर राहिले 2023 हे वर्ष, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच केला हा पराक्रम)
यावर्षी हे भारतीय खेळाडूंचे झाले लग्न
केएल राहुल: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने यावर्षी 23 जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्न केले. अथिया शेट्टी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे.
अक्षर पटेल: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलचाही या यादीत समावेश आहे. टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेलने यावर्षी 27 जानेवारीला त्याची गर्लफ्रेंड मेहा पटेलसोबत लग्न केले. दोघांचे लग्न वडोदरात झाले.
शार्दुल ठाकूर: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. शार्दुल ठाकूरने यावर्षी 27 फेब्रुवारीला मिताली परुलकरसोबत लग्न केले. लग्नापूर्वी शार्दुल ठाकूरने 2021 मध्ये एंगेजमेंट केली होती.
ऋतुराज गायकवाड: टीम इंडियाचा युवा स्फोटक फलंदाज ऋतुराज गायकवाडने यावर्षी 3 जानेवारी रोजी उत्कर्षा पवारसोबत लग्न केले. उत्कर्षा पवार ही देखील एक क्रिकेटपटू आहे, जी महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते. ऋतुराज गायकवाडने यंदा चमकदार कामगिरी केली आहे.
प्रसिध कृष्णा: टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने यावर्षी 8 जून रोजी रचनाशी लग्न केले. दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर असताना प्रसिध कृष्णाने लग्न केले.
नवदीप सैनी: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचाही या यादीत समावेश आहे. दीर्घकाळ संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याचवर्षी 24 नोव्हेंबरला विवाहबद्ध झाला. नवदीप सैनीने त्याची मैत्रीण स्वाती अस्थाना हिच्याशी लग्न केले.
मुकेश कुमार: टीम इंडियाचा स्टार बॉलर मुकेश कुमारने नुकतेच 28 नोव्हेंबरला लग्न केले. मुकेश कुमारने दिव्या सिंहसोबत लग्न केले.