क्रिकेट विश्वात यंदा अनेक क्रिकेटपटुंनी लग्न केले. पाकिस्तान संघाचा गोलंदाज हसन अली याच्यानंतर आता आणखी एक मोठे नाव त्यांच्यात सामील झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी फलंदाज आणि कर्णधार ग्रॅम स्मिथ (Graeme Smith) याने दुसरे लग्न केले आहे. काही महिन्यांपूर्वीच आपल्या गर्लफ्रेंडशी साखरपुडा केला होता. ग्रॅमने यापूर्वी ऑगस्ट 2011 मध्ये आयरिश गायक मॉर्गन डीन हिच्यासह लग्न केले होते. 2012 मध्ये, मुलगी कॅंडेस क्रिस्टीन स्मिथ हीचा जन्म झाला आणि त्यानंतर एक वर्षानंतर मुलगा कॅमोरीन याचा जन्म झाला. पण, 2015 मध्ये स्मिथ आणि मॉर्गनच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी त्याच वर्षी घटस्फोट घेतला. आणि आता रोमी लानफ्रेंचि (Romy Lanfranchi) सह संबंध असताना ग्रॅमीला एक मुलगा देखील आहे. ग्रॅमने दोंघाच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रत्येक जोडप्याप्रमाणे ग्रॅम आणि रोमी त्यांच्या लग्नाच्या दिवशी सुंदर दिसत होते.
ग्रॅमने फोटोज शेअर करताना लिहिले की, "2 नोव्हेंबर हा अविश्वसनीय दिवस होता!!" रोमीनेही इंस्टाग्रामवर लग्नाचे अनेक फोटोज शेअर करत भावनिक पोस्ट देखील लिहिली. रोमीने लिहिले, "माझ्याकडे शब्दांची कमी नसते, पण आज आहे. आमच्या विशेष दिवसाच्या परिपूर्णतेचे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द नाहीत."
2 November was an incredible day!!❤️
#wedding #love #beloftebos #family #friends #blendedfamily #Celebrations 😍💍 pic.twitter.com/8Ft5R9xM1r
— Graeme Smith (@GraemeSmith49) November 4, 2019
रोमी लानफ्रेंचि
कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधारांबद्दल चर्चा होते तेव्हा ग्रॅमचे नाव सर्वात आधी घेतले जाते. त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने चांगली कामगिरी बजावली होती. त्याने आफ्रिकेसाठी 117 कसोटी सामन्यात 47.76 च्या सरासरीने 9265 धावा केल्या आहेत. यात 27 शतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 197 सामने खेळत 37.78 च्या सरासरीने 6989 धावा केल्या, तर टी -20 क्रिकेटमध्ये 33 सामने खेळला आणि 31.68 च्या सरासरीने 982 धावा केल्या. 2014 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यशस्वी कर्णधारपदीनंतर आता ग्रॅमने क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून काम करत आहे. आफ्रिका संघाच्या भारत दौऱ्यादरम्यान ग्रॅम भारतात आला होता.