
Ross Taylor Comes Out of Retirement: न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू रॉस टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. मात्र, तो आता न्यूझीलंडसाठी खेळताना दिसणार नाही. 41 वर्षांच्या या दिग्गज खेळाडूने समोआ देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा हा निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे. टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पात्र ठरण्यावर त्याचे लक्ष आहे. रॉस टेलरने अनेक वर्षे न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळले. ब्लॅक कॅप्ससाठी त्याने सुमारे 450 सामन्यांमध्ये भाग घेतला होता. 2022 मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली होती. आता 3 वर्षांनंतर तो समोआसाठी खेळताना दिसेल, जो त्याच्या आईचा देश आहे. एप्रिल 2025 नंतर तो समोआसाठी खेळण्यास पात्र ठरला आहे, कारण त्याला न्यूझीलंड संघ सोडल्याला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर दिली माहिती
रॉस टेलरने स्वतः सोशल मीडियावर येऊन समोआसाठी खेळणार असल्याची घोषणा केली. त्याने आपल्या निवेदनात म्हटले की, ‘हे अधिकृत आहे. मी जाहीर करताना अभिमान वाटतो आहे की मी आता निळ्या जर्सीमध्ये दिसेन आणि क्रिकेटमध्ये समोआचे नेतृत्व करेन. माझ्यासाठी ही केवळ खेळात परत येण्यापेक्षा जास्त आहे. मला माझ्या वारशाचे, संस्कृतीचे, गावाचे आणि कुटुंबाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. माझा अनुभव शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे.’
Hardik Pandya New Look: आशिया कपपूर्वी हार्दिक पांड्याचा नवा लूक समोर, फोटो व्हायरल
रॉस टेलर समोआसाठी कधी खेळणार?
रॉस टेलर ऑक्टोबर 2025 मध्ये ओमानमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक आशिया-पॅसिफिक क्वालिफायिंग मालिकेत खेळेल. समोआ संघ ग्रुप 3 चा भाग असून त्यांच्यासोबत ओमान आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत. या स्पर्धेतील टॉप ३ संघ भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2026 साठी पात्र ठरतील.