Hardik Pandya (Photo Credit- X)

Hardik Pandya New Look: आशिया कप  2025 सुरू होण्यास (Asia Cup 2025) आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. भारतीय संघही यूएईला रवाना झाला आहे. 5 सप्टेंबर रोजी भारतीय संघ आशिया कपपूर्वी आयसीसी अकादमीमध्ये पहिला सराव सत्रात सहभागी होईल, अशी माहिती मिळत आहे. आशिया कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुबईला रवाना झाले आहेत. अशातच, या मोठ्या स्पर्धेपूर्वी हार्दिकने एक नवा लूक स्वीकारला आहे. (ED Summoned Shikhar Dhawan: अवैध बेटिंग ॲप प्रकरणी शिखर धवनला ईडीचे समन्स, चौकशीसाठी बोलावले)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93)

आशिया कपपूर्वी हार्दिक पांड्याचा 'नवा लूक'

9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका नव्या लूकमध्ये दिसला. त्याने आपले केस कापले असून त्यांना सँडी ब्लॉन्ड कलरही दिला आहे. हा नवा लूक त्याच्यावर खूप छान दिसत आहे. हार्दिकने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन लूकचे फोटो शेअर केले आहेत.

आशिया कपमध्ये हार्दिक पांड्या ठरू शकतो 'एक्स फॅक्टर'

आशिया कप 2025 मध्ये हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर सिद्ध होऊ शकतो. तो संघातील वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये कमाल करू शकतो. फलंदाजीमध्ये तो संघासाठी खालच्या फळीत महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो. तर गोलंदाजीत तो आपल्या कोट्यातील पूर्ण 4 षटके टाकू शकतो आणि काही महत्त्वाचे बळीही घेऊ शकतो.

आशिया कपसाठी भारताचे वेळापत्रक

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी स्पर्धेत आपला पहिला सामना यूएईविरुद्ध खेळेल. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. 18 सप्टेंबर रोजी भारत गट फेरीतील शेवटच्या सामन्यात ओमानशी भिडेल.