कसोटीपटू, भारताचे माजी सलामीवीर फलंदाज माधव आपटे यांचे आज निधन; मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Madhav Apte (Twitter)

भारताचे माजी खेळाडू माधव आपटे (Madhav Apte) याचे आज सोमवारी निधन झाले आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कॅण्डी (Breach Candy Hospital) रुग्णालयात त्यांनी सोमवारी पहाटे 6 वाजता अखेरचा श्वास घेतला आहे. माधव आपटे यांना भारतीय संघात काहीच सामने खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यापैकीही काही सामने माधव आपटे यांनी गाजवले होते. तसेच कसोटी क्रिकेटमधील 7 सामन्यात माधव यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्वही केले आहे. क्रिकेटमधील चमकदार तारा कायमचा ढगाआड गेल्यामुळे भारतीय क्रिकेट संघ तसेच माधव यांच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

माधव आपटे यांनी मुंबई संघातून पदार्पण करत रणजी सामन्यात सौराष्ट्रविरूद्ध शतक ठोकले होते. त्यानंतर 1952-1953 या काळात त्यांनी 7 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यावेळी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या 2 कसोटी सामन्यासाठी माधव आपटे यांची भारतीय संघात निवड झाली. दरम्यान, माधव यांनी उत्तम खेळी केली होती. यामुळे माधव आपटे यांची वेस्ट इंडिच दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. आपटे यांनी 5 सामन्यांच्या मालिकेत सलामीला खेळताना 1 शतक आणि अर्धशतकांसह 51.11 च्या सरासरीने 460 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या गोलदांजाची धुलाई करत माधव आपटे यांनी 163 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ते दुसरे फलंदाज ठरले होते. हा विक्रम 18 वर्ष त्यांच्या नावावर होता. या दौऱ्यानंतर त्यांना पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले नाही. माधव आपटे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळत 67 सामन्यात 3336 धावांचे शिखर गाठले होते. यात 7 शतकांचा समावेश आहे. हे देखील वाचा-IND vs SA 3rd T20I: तिसऱ्या मॅचआधी विराट कोहली ने करून दाखवले आजच्या लहान मुलांचे हाव-भाव, Fans आश्चर्यचकित

माधव आपटे यांची गुरू अशीच ओळख निर्माण झाली होती. त्यांनी जात, धर्म, लिंग, गरीब-श्रीमंत या भेदांपलीकडे जाऊन अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. त्यांचा स्वभावही खिलाडूवृत्तीचा होता. त्यामुळे क्रिकेटपासून ते उद्योग क्षेत्रात त्यांचा मित्र परिवार होता. माधव आपटे एका खेळाडू बरोबर यशस्वी उद्योजक म्हणूनही ते परिचित होते.