Ford Trophy: न्यूझीलंड क्रिकेटपटू ग्लेन फिलिप्स याने खेळलेला विचित्र शॉट पाहून विरोधी खेळाडू आणि प्रेक्षकही झाले थक्क, पाहा Video
ग्लेन फिलिप्स (Photo Credit: Twitter/@ICC)

न्यूझीलंड (New Zealand) मध्ये देशांतर्गत वनडे स्पर्धेत फोर्ड ट्रॉफीमध्ये ग्लेन फिलिप्स (Glenn Philips) याने फलंदाजाने दणदणीत फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली. ऑकलंड (Auckland) आणि ओटागो (Otago) संघांदरम्यानच्या या सामन्यात ऑकलंडचा फलंदाज ग्लेनने 135 चेंडूत 156 धावांची दमदार खेळी केली. यावेळी, त्याच्या उभे राहण्याच्या शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले, याशिवाय त्याच्या एका शॉटचा विडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विश्व क्रिकेट सुरू झाल्यानंतर फलंदाजांकडून विविध प्रकारचे शॉट्स पाहायला मिळाले आहे. तांत्रिकदृष्ट्या खेळलेले शॉट्स स्वत: अतिशय खास आणि चित्तथरारक असतात, परंतु असे क्रिकेट विश्वात असे शॉट्स देखील आहेत जे अतिशय अनोखे दिसतात. टी-20 क्रिकेट जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासून वेगवान धावा करण्यासाठी फलंदाजांनी स्वत:च्या फलंदाजीत बदल करत विविध प्रकारचे शॉट्स खेळण्यास सुरुवात केली. (Syed Mushtaq Ali Trophy 2019-20: रन आऊट झाल्यावर सह खेळाडूवर भडकला राहुल तेवतिया, मैदानावर अशाप्रकारे व्यक्त केला राग, पाहा Video)

या अद्वितीय आणि पूर्णपणे भिन्न शॉट्सच्या विविध प्रकारांना भिन्न नावे दिली गेली.  यादरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक आगळा-वेगळा शॉट न्यूझीलंडमधील देशांतर्गत स्पर्धेत पाहायला मिळाला, जो पूर्णपणे वेगळा शॉट होता. ऑकलंडच्या ग्लेनने एक अनोखा रिव्हर्स शॉट खेळला. एक प्रकारे शॉट गोलंदाजीच्या भावनांशी खेळला. फिलिप्सचा हा अनोखा रिव्हर्स शॉट पाहून विरोधी संघातील खेळाडू आणि प्रेक्षकही थक्क झाले. फिलिप्सने षटकारसाठी लागवलेला हा शॉट क्रिकेटमध्ये पहिले कधीही पाहायला मिळाला नव्हता की या शॉट ची दाखल खुद्द आयसीसीनेही घेतली. आयसीसीने ट्विटरवर फिलिप्सच्या या शॉटचा व्हिडिओ शेअर करत 'या शॉटचे नाव' विचारले. पाहा या विचित्र शॉटचा हा व्हिडिओ:

मॅचबद्दल बोलले तर, फिलिप्स आणि मार्टिन गुप्टिल यांच्या डावाच्या जोरावर ऑकलंडने 50 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 310 धावांची विशाल धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल, ओटागोचा नील ब्रूम याने 66 धावांची खेळी केली. त्याने मिच रेनविक याच्यासह भागीदारी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न कामी आले नाही आणि संपूर्ण संघ 213 बाद झाला. ऑकलंडने 97 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली.