Syed Mushtaq Ali Trophy 2019-20: रन आऊट झाल्यावर सह खेळाडूवर भडकला राहुल तेवतिया, मैदानावर अशाप्रकारे व्यक्त केला राग, पाहा Video
राहुल तेवतिया (Photo Credit: Facebook)

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये काल, बुधवारी अंतिम लीग सामानाने खेळण्यात आले. दिवसाच्या तिसर्‍या सामन्यात हरियाणा (Haryana) आणि महाराष्ट्र (Maharashtra) संघात लीग फेरीतील अंतिम सामना रंगला. हरियाणाने यापूर्वीच सेमीफायनल फेरीत आपले स्थान निश्चित केले होते, तर महाराष्ट्रावर बाहेर पडण्याचा धोका होता. या सामन्यात हरियाणाचा पराभव झाला पण महाराष्ट्राला रनरेटच्या आधारावर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या सामन्यात महाराष्ट्राने पहिले फलंदाजी करत 168 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना हरियाणाचा अष्टपैलू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याचा राग पाहण्यासारखा होता. 14 व्या ओव्हरदरम्यान राहुल त्याचा टीममेट हिमांशू राणा (Himanshu Rana) याच्यावर भडकला आणि मैदानातच त्याला चार शब्द ऐकवले. नौशाद शेख याच्या 14 व्या ओव्हरमधील तिसरा चेंडू राणाने डीप मिड-विकेटवर रुतुराज गायकवाड याच्याकडे शॉट मारला. दुसरा धाव घेण्यास उत्सुक असलेल्या तेवतियाने दुसर्‍या धावादरम्यान राणाकडे पाहिलेही नाही उलट्या शेवटच्या दिशेने धाव घेतली आणि रन आऊट झाला. (Syed Mushtaq Ali Trophy: तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा आणि राजस्थान संघात होणार सेमीफायनलची लढत, मुंबई लीग फेरीतच गारद)

राहुलने 13 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह 28 धावा फटकावल्या. दुसर्‍या टोकाला असलेल्या हिमांशुनने धाव घेण्यासाठी क्रीज सोडली नाही आणि त्यामुळे तेवतिया धावबाद झाला. यानंतर तो हिमांशूवर ओरडला आणि आरडाओरडा करण्यास सुरवात केली. मिडऑनवर शॉट खेळल्यानंतर राहुलने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पहिला रन पूर्ण झाल्यावर राणा धावला नाही पण राहुल त्याच्याकडे न पाहता पळायला लागला, ज्यामुळे तो धावबाद झाला. पाहा या घटनेचा हा व्हिडिओ:

राहुलनंतर राणाही रन आऊट होत पॅव्हेलियनमध्ये परतला. अंतिम ओव्हरमध्ये हरियाणाला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती परंतु त्यांचे फलंदाज केवळ 8 धावा करु शकले. सलग 9 मॅच जिंकल्यावर हरियाणाला पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्राने हा सामना 2 धावांनी जिंकला परंतु असे असूनही ते स्पर्धेतून बाहेर पडले. या सर्व संघांपैकी राजस्थानमध्ये सर्वोत्तम रनरेटच्या आधारावर सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. हरियाणाने या गटातून यापूर्वी 12 गुणांसह उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते.