Syed Mushtaq Ali Trophy: तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा आणि राजस्थान संघात होणार सेमीफायनलची लढत, मुंबई लीग फेरीतच गारद
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मधील सुपर लीग सामन्यांचा काळ अखेरचा दिवस होता. तामिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटक (Karnataka), हरियाणा (Haryana) आणि राजस्थान (Rajasthan) संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर मुंबईचा संघ लीग फेरीतून बाहेर पडला आहे. सूरतमध्ये झालेल्या अखेरच्या सुपर लीग सामन्यात झारखंडला सहज आठ विकेट्सने पराभूत करून तामिळनाडूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. सुपर लीग ग्रुप बीमध्ये तमिळनाडूने अखेरचे चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि निव्वळ 0.869 रनरेटसह अव्वल स्थान पटकावले आहे. कर्नाटक तमिळनाडूसारख्या समान 12 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आणि अखेरच्या सामन्यात पंजाबचा पराभव करून मुंबईनेही 12 गुणांची कमाई केली. पण, हा सामना जिंकूनही मुंबईला सेमीफायनलसाठी पात्र मिळू शकली नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा पहिला सेमीफायनल सामना 29 नोव्हेंबरला तमिळनाडू आणि राजस्थान यांच्यात खेळला जाईल, तर दुसरा कर्नाटक आणि हरियाणा संघात होईल.

ग्रुप ए दोन थरारक समानें पाहायला मिळाले आणि शेवटी राजस्थानने हरियाणासह उपांत्य फेरी गाठली. मुंबईचे तीन स्टार फलंदाज पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार फलंदाजी केली. शॉने 27 चेंडूत 53 धावा केल्या, कर्णधार सूर्यकुमारने 35 चेंडूत 80 धावांची डाव खेळला आणि श्रेयसने संघासाठी 40 चेंडूंत 80 धावांची नाबाद खेळी खेळली. पण, या तिन्ही फलंदाजांचा खेळ संघाला सेमीफायनलमध्ये नेण्यास पुरेसा नव्हता. पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात सलामी फलंदाज शुभमन गिल याने 38 चेंडूत 78 धावांची शानदार खेळी केली.

दरम्यान, राजस्थान आणि दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात सर्वांचे लक्ष रिषभ पंत याच्यावर होते. 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंतला पुन्हा एकदा त्याची चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावांमध्ये रूपांतरण करण्यात अपयशी राहिला. पंतने 27 चेंडूत 30 धावा केल्या. दिल्लीची मधली फळी अपयशी ठरली असली तरी ललित यादव आणि वरुण सूद यांनी त्यांच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या. तथापि, अखेर ते दोन धावा कमी पडले.