Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 150 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 7 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ॲलेक्स कॅरी (19) आणि मिचेल स्टार्क (6) धावांवर नाबाद आहे.

भारतीय फलंदाज फ्लाॅप

प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी आले मात्र त्यांना विशेष काही करता आले नाही. तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. जैस्वाला खातेही उघडता आले नाही. यानंतर देवदत्त पडिक्कलही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि केवळ 5 धावा करून जोश हेझलवूडचा बळी ठरला. या वेळी केएल राहुलने (KL Rahul) एक टोक धरले आणि हळूहळू संघाच्या खात्यात धावांची भर घातली पण तोही 26 धावा करुन बाद झाला.

जोश हेझलवूडने घेतल्या 4 विकेट

लंच ब्रेकनंतर मिचेल मार्शने ध्रुव जुरेल (11) आणि वॉशिंग्टन सुंदर (4) यांना आपला बळी बनवले. 37 धावा करू शकणाऱ्या पॅट कमिन्सने पंतची मौल्यवान विकेट घेतली. यानंतर हर्षित राणा 7 धावा करून बाद झाला तर कर्णधार जसप्रीत बुमराह 8 धावा करून बाद झाला. भारताला शेवटचा धक्का नितीश राणाच्या रूपाने बसला. तो 41 धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 4 विकेट घेतल्या. तसेच, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी 2-2 विकेट घेतल्या.

भारतीय गोलंदाजांचा कहर

त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला 14 च्या स्कोअरवर मॅकस्वीनीच्या रूपात पहिली विकेट गमावली. बुमराहने 19 धावांवर ख्वाजाला आपला दुसरा बळी बनवला, पुढच्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथही एलबीडब्ल्यू झाला. यानंतर हर्षित राणाने ट्रॅव्हिस हेडला 31 धावांवर बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. मोहम्मद सिराजने मिचेल मार्शला बाद केले. त्यानंतर सिराजने मार्नस लॅबुशेनला बाद करून ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला झेलबाद केले.