उमरान मलिक (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021: आयपीएल 2021 चा प्रवास अनेक खेळाडूंसाठी अवस्मरणीय ठरला आहे. सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने यावर्षी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा 21 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. याशिवाय, दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खान यानेही त्याच्या अचूक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. या हंगामात अनेक वेगवान गोलंदाजांनी वेगाने चेंडू टाकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर, या हंगामात कोणत्या तीन खेळाडूंनी सर्वात वेगवान चेंडू टाकला, त्यांची नावे जाणून घेऊया.

या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम भारताचा युवा खेळाडू उम्रान मलिकच्या नावावर आहे. त्यानंतर या यादीत न्युझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, दक्षिण अफ्रिकेचा गोलंदाज एनरिक नॉर्टजे तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे देखील वाचा- World Cup मध्ये भारताकडून पाकिस्तान 12 वेळा पराभूत, तरीही नाहीत तुटत अभिमान, आता Babar Azam ने केला मोठा दावा

उम्रान मलिक-

जम्मू-काश्मीरचा 21 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने संधी दिली. त्याने या हंगामात हैदराबादसाठी 3 सामने खेळले असून दोन विकेट्स पटकावले आहेत. मात्र, वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तो अव्वल आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याच्या पहिल्या सामन्यात 151 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध सामन्यातही त्याने चक्क 153 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

लॉकी फर्ग्युसन-

या यादीतील दुसरे नाव किवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचे आहे. केकेआरकडून खेळताना त्याने सुमारे 153 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. मलिक प्रमाणे, त्यानेही या मोसमात चार वेळा पहिल्या 10 वेगवान चेंडूंमध्ये गोलंदाजी केली. आयपीएल 2021 मधील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने या हंगामात कोलकातासाठी 7 सामने खेळले आहेत आणि सात डावांमध्ये 12.92 च्या सरासरीने 13 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या 14 व्या हंगामात त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 18 धावांसाठी तीन विकेट्स आहे.

एनरिक नॉर्टजे-

या यादीत एनरिक नॉर्टजे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना सुमारे 152 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आहे. त्याने या मोसमातील सर्वात वेगवान 10 चेंडूंमध्ये दुप्पट वेगाने गोलंदाजी केली. त्याने या हंगामात दिल्लीसाठी आठ सामने खेळले आणि आठ डावांमध्ये 15.58 च्या सरासरीने 12 विकेट्स मिळवले आहेत.