World Cup मध्ये भारताकडून पाकिस्तान 12 वेळा पराभूत, तरीही नाहीत तुटत अभिमान, आता Babar Azam ने केला मोठा दावा
विराट कोहली आणि बाबर आजम (Photo Credit: Getty)

3 दिवसांनी टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. पहिले पात्रता फेरी खेळली जाणार आहे पण सर्वांचे लक्ष्य 24 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हाय -व्होल्टेज सामन्याकडे आहेत. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) माईंड गेम सुरू केला आहे. त्याने या सामन्यात आपल्या संघाच्या विजयाचा दावा केला आहे. ते सुद्धा जेव्हा पाकिस्तान भारताला टी-20 आणि वनडे विश्वचषक स्पर्धेत एकदाही हरवू शकलेला नाही. दोन्ही देश एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत 7 आणि टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मध्ये 5 वेळा आमनेसामने आले आहेत. पण एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. पण यंदा बाबर आजम विजयाचे स्वप्न पाहत आहे.  यामागचे कारण म्हणजे पाकिस्तान संघ (Pakistan Cricket Team) गेल्या एक दशकपासून युएई येथे आपले आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. येथील खेळपट्टी आणि हवामानाची अधिक माहितीचा पाकिस्तान संघाला होऊ शकतो. (T20 World Cup 2021: पाकिस्तान बोर्डावर संतापला माजी दिग्गज कर्णधार, ‘या’ खेळाडूच्या सिलेक्शनवर म्हणाला - ‘जेव्हा खेळवायचे नाही तर...’)

पाकिस्तानचा कर्णधार बाबरने पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही गेल्या तीन-चार वर्षांपासून यूएईमध्ये क्रिकेट खेळत आहोत. आम्हाला इथल्या परिस्थितीची चांगली माहिती आहे. आम्हाला माहित आहे की येथे विकेट कशी खेळते आणि खेळपट्टीनुसार फलंदाजांना त्यांच्या खेळात काय बदल करावे लागतात. माझा विश्वास आहे की जो संघ त्या दिवशी चांगले क्रिकेट खेळेल. ती सामना जिंकेल. जर तुम्ही मला विचारले तर आम्ही हा सामना जिंकणार आहोत.” तो म्हणाला की, “एक संघ म्हणून आमचा आत्मविश्वास आणि मनोबल खरोखर उंच आहे. आम्ही भूतकाळाचा नाही तर भविष्याचा विचार करत आहोत. आम्हाला माहित आहे की हा एक उच्च व्होल्टेज सामना आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. मला खात्री आहे की आमची तयारी चांगली आहे आणि आम्ही भारताला त्या दिवशी कठीण स्पर्धा देऊ. आमचा हेतू हा सामना जिंकण्याचा आणि स्पर्धेत गती मिळवण्याचा असेल.”

टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे तर टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध वरचष्मा आहे. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकच्या सर्व 5 सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. 2007 मध्ये टीम इंडियाने ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. याशिवाय टीम इंडिया 2012, 2014 आणि 2016 मध्ये जिंकण्यातही यशस्वी झाली होती. तसेच 2016 विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने पहिले फलंदाजी करून 5 गडी बाद 118 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 4 विकेट गमावून लक्ष्य साध्य केले.